आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ८ सप्टेंबर, २०२४

दुर्गाबाई रामभाऊ पाटील यांचे निधन

पेण -वाशी (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षिका पुरस्कार प्राप्त आंबेघर केंद्राच्या माजी केंद्रप्रमुखा सौ. दुर्गाबाई रामभाऊ पाटील यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दि. ३ सप्टेंबर  रोजी राहत्या घरी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ७७ वर्ष होते.
     अंत्ययात्रेला पंचक्रोशीतील अनेक मान्यवर, केंद्रप्रमुख, शिक्षक, नातेवाईक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा कुटुंब परिवार आहे.
    जिल्हा परिषद शाळा मोरबे-कर्जत वाशी ओढांगी गावात शिक्षिका म्हणून काम पाहिले. त्यानंतर पुढील शिक्षण पूर्ण करून केंद्रप्रमुख बनल्या, त्यांच्याकडे १० वर्षे आंबेघर केंद्राचे काम सोपविण्यात आले. अत्यंत निष्टेने,प्रामाणिकपणे त्यांनी आपले विद्यादानाचे कार्य करून अनेक विदयार्थ्यांना, नागरिकांना घडविले.उत्तम वक्तृत्व, उत्तम भजन गायिका, उत्तम मार्गदर्शिका म्हणून त्यांनी शिक्षणक्षेत्रात स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविला.आत्मविश्वास, शिस्त, स्वावलंबी या गुणांनी त्यांनी आपल्या शिक्षकांपुढे एक स्वतःचा वेगळाच ठसा निर्माण केला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन १९९९ मध्ये त्यांना सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यांत आले होते.
    त्यांच्या निधनाने एक आदर्श व्यक्तिमत्व गमावल्याची खंत शिक्षणक्षेत्रातून व्यक्त होत आहे. त्यांच दहावं १२ सप्टेंबर रोजी उद्धर येथे होणार आहे तसेच उत्तरकार्य १५ सप्टेंबर रोजी राहत्या घरी होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नेरे गावचा सुपुत्र गायक रवींद्र जाधव साई इंटरटेनमेंटच्या 'स्टार महाराष्ट्राचा' पुरस्काराने सन्मानित

गडब (अवंतिका म्हात्रे)एमसीयम टीव्ही आणि साईसागर आयोजित स्टार महाराष्ट्रचा पर्व १० वे पनवेल येथील २१ सप्टेंबर रोजी, आद्यक्रांतीवर वासुदेव बळ...