आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २२ सप्टेंबर, २०२४

नेरे गावचा सुपुत्र गायक रवींद्र जाधव साई इंटरटेनमेंटच्या 'स्टार महाराष्ट्राचा' पुरस्काराने सन्मानित

गडब (अवंतिका म्हात्रे)एमसीयम टीव्ही आणि साईसागर आयोजित स्टार महाराष्ट्रचा पर्व १० वे पनवेल येथील २१ सप्टेंबर रोजी, आद्यक्रांतीवर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न झाला.
    यावेळी पनवेल तालुक्यातील नेरे गावचे सुप्रसिद्ध गायक रवींद्र जाधव यांना स्टार महाराष्ट्राचा सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले.याच बरोबर एमसीएम टीव्ही आणि साईनगर एंटरटेनमेंट यांच्याकडून अनेक कलाकारांना सुद्धा हा पुरस्कार वितरित करण्यात आला असून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले . तसेच आगामी काळामध्ये यांच्यावर सिनेमाही येणार असल्याचं जनार्दन शिंदे यांनी सांगितले. यावेळी सुप्रसिद्ध गायक मुकेश उपाध्याय आणि अनेक कलाकार मंडळी उपस्थित होते.
   रवींद्र जाधव एक छोटासा गायक कलाकार आज साई सागर एंटरटेनमेंटच्या वतीने संगीत कलाक्षेत्रातून कलाकाराची दखल घेतलेली आहे. म्हणजे साई सागर एंटरटेनमेंट चे करता-करविता आदरणीय जनार्दन शिंदे साहेब यांनी एका छोट्या कलाकाराला तब्बल २० वर्षामध्ये त्या कालावधीमध्ये काम करत असताना रविंद्र जाधव यांची कदर करून त्यांना हा पुरस्कार अर्थात साई सागर एंटरटेनमेंट च्या वतीने जनार्दन शिंदे साहेब यांनी दिलेला आहे. म्हणजे स्टार महाराष्ट्राचा पुरस्कार आज त्यांना मिळाला आहे. जवळजवळ २२ वर्षानंतर त्यांच्या कलेची दखल जी घेतली ते म्हणजे आदरणीय जनार्दन शिंदे साहेब आणि त्यांचे मित्र मुकेश उपाध्याय यांनी त्यांची वर्णी यांच्याकडे करून स्टार महाराष्ट्राचा पुरस्कार त्यांना दिला त्यामुळे गायक रविंद्र जाधव यांना खूप आनंद होत आहे
   २०-२२ वर्षानंतर त्यांची गणना कलाक्षेत्रामध्ये केली गेली आणि मला हा पुरस्कार मिळाला. असे त्यांनी पत्रकारांशी  प्रतिक्रीया देताना सांगितले .त्यांना मिळालेल्या या उज्वल यशाबद्दल संपूर्ण रायगड जिल्ह्यातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नेरे गावचा सुपुत्र गायक रवींद्र जाधव साई इंटरटेनमेंटच्या 'स्टार महाराष्ट्राचा' पुरस्काराने सन्मानित

गडब (अवंतिका म्हात्रे)एमसीयम टीव्ही आणि साईसागर आयोजित स्टार महाराष्ट्रचा पर्व १० वे पनवेल येथील २१ सप्टेंबर रोजी, आद्यक्रांतीवर वासुदेव बळ...