नवी मुंबई(प्रतिनिधी) सामाजिक, साहित्य व कामगार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कला सामाजिक संस्था, नवी मुंबई तर्फे नवी मुंबईतील ज्येष्ठ वृत्तपत्रलेखक श्री भरत पांडुरंग भोसले ( इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर) ह्यांना प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत " जीवन गौरव पुरस्कार - २०२४ " प्रदान करण्यात आला . या शुभप्रसंगी हा राष्ट्रीय पुरस्कार सन्माननीय प्रमुख पाहुणे मा रेहाना शेख ( सहायक पोलीस आयुक्त पी अँड एस राजभवन सुरक्षा, मुंबई ), कोकण विभागीय शिक्षक आमदार मा ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रसिद्ध कवी, लेखक, वक्ते मा नितीन चंदनशिवय, तसेच हास्यसम्राट, एकपात्री कलाकार मा जयंत ओक, ह्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह , प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले . रविवार दि २२ सप्टेंबर, २०२४ रोजी कराडी समाज सभागृह, कामोठे, नवी मुंबई येथे भव्यदिव्य ' राष्ट्रीय पुरस्कार प्रदान ' सोहळ्यात पार पडलेल्या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या अध्यक्षा मेघा महाजन , उपाध्यक्ष श्रीराम महाजन , तर सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक सुश्री अनघा जाधव हयांनी केले .
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि छत्र्यांचे वाटप
मुंबई :भारतीय लोकसेवा समिती, मुंबई ह्या संस्थेतर्फे राईपाडा आणि खारागोडा पाडा, ता. भिवंडी, ज...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा