आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०२४

2बी स्टुडिओ कडून गणपती देव माझा 2.0 गाण्याची भेट ; गीतकार हृषीकेश कडू,गायक अतिष मोकल ,संगीत संयोजक वरुध पाटील,दिग्दर्शक योगेश ठाकूर यांचे कौतुक ; गणेशोत्सवात सुमधुर आवाजातील गणपती देव माझा.. फेऱ्यांच्या गीतास गणेश भक्तांकडून चांगली पसंती

मुंबई (प्रतिनिधी)सण आला नारळी पुनवचा " या गाण्याच्या यशस्वीरित्या वाटचाली नंतर यावर्षी गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त 
विठ्ठल रखुमाई महिला हरिपाठ मंडळ, दूंदरे आणि 2बी स्टुडिओ यांच्या मार्फत गणपती देव माझा हे धमाकेदार फेऱ्यांचे गीत नव्या रुपात सादर करण्यात आले आहे. हे गीत हृषीकेश कडू यांनी लिहले असून अतिष मोकल यांनी गायले आहे. तर संगीत संयोजन वरुध पाटील व दिग्दर्शन योगेश ठाकूर यांनी केले आहे. महिला कलाकारांसह गीतकार ऋषीकेश कडू यांच्यासोबत हे गीत चित्रित करण्यात आले आहे.हे गीत सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
     सदर गीताच्या सर्वच बाजू उजव्या ठरल्याने ते श्रवणीय व प्रेक्षणीय झाले आहे. 2बी स्टुडिओ या यु ट्यूब वर जाऊन या गाण्याचे नावाने सर्च केल्यास त्या गाण्याचा आनंद गणेश भक्तांना घेता येईल. गाण्याची लिंक पुढीप्रमाणे 

*https://youtu.be/QNqq3bC3SnA*
*गणपती देव माझा 2.0*
*https://youtu.be/QNqq3bC3SnA*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

कृष्णा कदम याना समाजभूषण पुरस्कार जाहीर

मुंबई (उत्कर्ष गुडेकर)ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू रुग्णांना मदतीचा हात देत वैद्यकीय उपचारसाठी सहकार्य करणाऱ्या कृष्णा मारुती ...