आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०२४

मुंबई ते वैष्णुदैवी जम्मुकटरा अशी सायकल यात्रा करणाऱ्या युवकांना शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी दिल्या शुभेच्छा !

कल्याण- देशात शांतता नांदावी आणि देश पुन्हा सुजलाम सुफलाम व्हावा या साठी वैष्णुदेवीला साकडे घालण्यासाठी मुंबई ते वैष्णुदेवी - जम्मुकटरा असा सायकल यात्रा करणाऱ्या युवकांना शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी शुभेच्छा देत त्यांचा संकल्प तडीस जावो अशा शुभेच्छा दिल्या.
    देशात या ना त्या कारणाने अनेक वेळा अशांततेचे वातावरण निर्माण होत आहे, शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे सतत संकटात सापडत आहे या परिस्थितीतून देशाला बाहेर कारण्यासाठी हिंदूची देवता असलेल्या जम्मु कश्मिर मधील वैष्णुदेवी ला साकडे घालण्यासाठी महाराष्ट्रातील काही युवक मुंबईतील ते वैष्णुदैवी सायकल प्रवास करीत वैष्णुदेवीला निघाले आहेत यात कल्याण पूर्वेतून अभिजित काळे यांच्या नेतृत्वाखालील १० युवकांचा समावेश आहे , या युवकांनी गुरुवारी सायकल प्रवासा दरम्यान शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या मातोश्री गुंजाई चौकातील जनसंपर्क कार्यालयात येवून महेश गायकवाड यांची सदिच्छा भेट घेतली . या समयी महेश गायकवाड यांनी या युवकांचे कौतुक करीत त्यांना त्यांचा हा संकल्प तडीस जावो आणि आपली सायकल यात्रा यशस्वी होवो अशा शुभेच्छा दिल्या .
    या वेळी महेश गायकवाड यांनी सांगितले की आधुनिक युगातील युवा पिढी अनेक युवक हे नशेच्या आहार जात आहे, या युवा अवस्तेतील तरुणाईला वेळीच योग्य नेतृत्वाची गरज असते, नेतृत्वहीन युवक भरकटत जावून नको त्या मार्गाला जातो परंतु अशा परिस्थितीनही आध्यात्मावर विश्वास ठेवून हे युवक देश हित लक्षात घेवून जिवाची पर्वा न करता वैष्णुदेवीला साकडे घालण्यासाठी सायकल यात्रा करीत जम्मु कटरा पर्यंत जाणार आहेत ही बाब नक्कीच आजच्या युवा पिढीला प्रेरणा देणारी आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

रेल्वे मालवाहतूकही होणार खाजगी!!

मुंबई (सतिश पाटील):  मुंबई महानगर प्रदेशातील मालवाहतुकीचा चेहरामोहरा बदलण्याच्या दिशेने रेल्वेने मोठे पाऊल टाकले आहे. मुलुंड, उरण, कळंबोली आ...