आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, ४ सप्टेंबर, २०२४

पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

मुंबई ( गणेश हिरवे)नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई आयोजित राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण केले जाणार असून सामाजिक, क्रीडा, कला,आरोग्य, शैक्षणिक,पत्रकारिता,उद्योग, प्रशासकीय या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.पुरस्कार विजेत्यांच्या सन्मान करून त्यांच्या भावी वाटचालीस तसेच उल्लेखनीय कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून उत्कृष्ट असा नवक्षितिज महाराष्ट्र गौरव पुरस्कार दिला जातो सदरचा कार्यक्रम रविवार दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी मुंबईत होणार असून यावेळी नवक्षितिज ट्रस्टच्या १० वर्षा केलेल्या कामाचा कार्य अहवाल प्रकाशित केला जाणार आहे.
     प्रस्ताव ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत सुनिल कुमरे, अध्यक्ष नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट आदर्श नगर आरे कॉलनी गोरेगाव पूर्व मुंबई ६५ या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

सोमवारी चिपळूण येथे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार यांची जाहीर सभा ; प्रशांत यादव यांची शरद पवार गट तर्फे विधानसभासाठी अधिकृत उमेदवारी होणार जाहीर

मुंबई (शांताराम गुडेकर )   राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरदचंद्र पवार हे पक्षाला खिंडार पाडणाऱ्याना खिंडीत गाठण्यासाठी महाराष्ट्र...