आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४

खान्देशातील बहुप्रतिक्षित व बहु प्रलंबित नार - पारसह सर्व प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेचे केंद्रिय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांना साकडे

प्रतिनिधी: केंद्रीय जलशक्ती मंत्री तथा खान्देशचे थोर सुपुत्र मा. ना.श्री. सी. आर.पाटील यांचे सोबत नवी दिल्ली येथील निवासस्थानी खान्देशच्या पाणी प्रश्नावर बैठक संपन्न झाली. या बैठकीत उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी उत्तर महाराष्ट्रातील 
 प्रस्तावित,बहु प्रतिक्षित आणि बहुप्रलंबित प्रकल्पा विषयी प्रकल्पनिहाय अभ्यासपूर्ण व सविस्तर निवेदन केंद्रीय जलसंपदा मंत्री मा.ना. श्री.सी.आर.पाटील.यांना दिले.निवेदनात नार पार नदीजोड प्रकल्पांतर्गत नार पार या अतीवृष्टीच्या खोऱ्यातील महाराष्ट्राच्या हक्काचं आणि हिश्याचं किमान ६०% पाणी अतीतुटीच्या खोऱ्यातील गिरणा, बोरी,मोसम,पांझरा व बुराई या नद्याकडे वळवावे असं आग्रही प्रतिपादन श्री.विकास पाटील यांनी केले... नार पार नदीजोड प्रकल्प, वांजुळ पाणी प्रकल्प,मांजरपाडा-२ प्रकल्पास मान्यता देणे,गिरणा नदीवरील 7 बलून बंधारे, तापी नदीवरील उकाई धरण पांझरा नदी लिंक योजना व उकाई धरण ते मौसम नदी लिंक योजना पुर्ण करणे,तापी नदीवरील हातनुर धरण डावा कालवा बांधणे,तापीवरील पाडळसरे,शेळगाव,सुलवाडे,सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजस वरील उपसा सिंचन योजना सौऊर्जेवर आधारित करणे.बंदिस्त पाईपलाईन व ठिबक व तुषार सिंचन योजनेद्वारे पाणी पुरवठा करणे,नर्मदा नदीतील आपल्या हिश्याच व हक्काचं पाणी ओंकारेश्वर, जुलवानिया मार्गे बोगद्याद्वारे, कालव्याद्वारे व नैसर्गिक वळण बंधारेव्दारे तापी नदीत सुलवाडे ब्यरेज मध्ये आणणे अशा विविध प्रकल्पांची मागणी करणारं निवेदन सादर करीत असताना हे प्रकल्प लाख दीड लाख कोटींचे प्रकल्प आहेत. पण आपल्याकडे असलेली निधीची उपलब्धता, कमतरता व प्राधान्यक्रम विचारात घेऊन कार्यवाही करु.दुष्काळमुक्त खान्देश,जलसंपन्न खान्देश,सुजलाम् सुफलाम् खान्देश हेच आमचंही स्वप्न आहे असं मंत्री महोदयांनी सूचित केलं...!
[[तापी नदीवरील निम्न तापी पाडळसरे प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करु आणि प्रकल्प पुर्ण करु ....!]]
....मा.ना.श्री. सी.आर.पाटील.
केंद्रीय जलशक्तीमंत्री,
भारत सरकार,नवी दिल्ली.

[[निम्न तापी पाडळसरे प्रकल्प खान्देशची अस्मिता म्हणून वाढीव निधीसाठी सार्वजनिक गुंतवणूक मंडळ व जलशक्ती मंत्रालयाकडून अधिक निधीसाठी मान्यता द्या...!]]
मा. ना. श्री.अनिल भाईदास पाटील.
आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री,महाराष्ट्र राज्य.

[[जळगाव जिल्ह्यातील प्रकल्पांना न्याय द्या,निधी द्या म्हणजे जिल्हा दुष्काळमुक्त व टंचाईमुक्त होईल...! ]]
... मा.श्रीमती. स्मिताताई वाघ,खासदार,जळगाव

[[ उत्तर महाराष्ट्रातील सर्वच बहु प्रतीक्षित व बहु प्रलंबित जल सिंचन प्रकल्पांना गती व दिशा द्या...! ]]
विकास पाटील.
अध्यक्ष,उत्तर महाराष्ट्र जल परिषद.

सदर प्रसंगी निम्न तापी पाडळसरे धरणाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत करून सार्वजनिक गुंतवणूक मंडळाकडे आवश्यक तो वाढीव निधी साठी प्रस्ताव सादर करणेसाठी आणि सद्याचा ज्वलंत प्रश्न नार पार नदीजोड प्रकल्पा विषयीसुद्धा सविस्तरपणे चर्चा विनिमय करणेसाठी महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री मा.ना.श्री.अनिलजी भाईदास पाटील आणि जळगांव च्या नवनिर्वाचित खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली पाडळसरे धरण संघर्ष समितीचे नेते सुभाष अण्णा चौधरी ,अर्बन बँकेचे व्हॉईस चेअमन रणजीत शिंदे,देविदास देसले, प्रताप साळी,भरतसिंग परदेशी व उत्तर महाराष्ट्र जल परिषदेचे अध्यक्ष विकास पाटील यांची संयुक्त मॅरेथॉन बैठक संपन्न झाली. केंद्रीय जलशक्ती मंत्री यांनी प्रतिनिधी मंडळास सकारात्मक प्रतिसाद दिला आणि प्रकल्प त्वरेने व वेगाने पूर्ण करणेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीन असे आश्र्वासित केले. पाडळसरे धरणामुळे जळगांव जिल्ह्यातील जळगांव, धरणगाव,अमळनेर,पारोळा,एरंडोल व भाडगाव तालुके जल समृद्ध होतील आणि हे सहा तालुके टंचाई मुक्त होतील पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगासाठी पाणी मिळेल.खान्देश चे सुपुत्र म्हणून खान्देश तुमच्याकडे आशेने पाहतोय,आपण खान्देश सुजलाम्,सुफलाम् करु शकतात असा आशावाद प्रतिनिधींनी व्यक्त केला...!
प्रतिनिधी मंडळाची मंत्री महोदयांशी सखोल व चौफेर चर्चा विनिमय घडून आली आणि मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला त्याबद्दल श्री.विकास पाटील यांनी समाधान व्यक्त केले...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

खासदार रवींद्र वायकर यांची अवयवदानासाठी नोंदणी

मुंबई (गणेश हिरवे).मुंबईतील शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी नुकतेच दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी के ई एम रुग्णालया...