आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २ सप्टेंबर, २०२४

दि.बा.पाटील सभागृह- जासई याठिकाणी भव्य आगरी समाज मेळावा उत्साहात संपन्न !!

मुलुंड( सतिश वि.पाटील)अखिल आगरी समाज परिषदेच्या वतीने आगरी समाजावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध भव्य मेळाव्याचे आयोजन दि.बा.पाटील सभागृह- जासई उरण याठिकाणी करण्यात आले होते . यावेळी प्रत्येक गावातील लोंकानी आपले प्रश्न उपस्थित मान्यवर आमदार, खासदार, नगरसेवक तसेच लोक प्रतिनिधी समोर मांडले. या कार्यक्रमास मुंबई उत्तर पूर्व लोकसभेचे खासदार मा.श्री संजय दिना पाटील तसेच भिवंडीतील लोकसभेचे खासदार मा.श्री सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) उपस्थित होते.आगरी समाजाच्या वतीने दोन्ही नवनिर्वाचित खासदार यांचा सत्कार करण्यात आला .त्यानंतर दोन्ही खासदारांकडून समाजातील प्रश्न सोडविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे जाहीर पणे अश्वासन दिले गेले.आपल्या समस्यां आमच्या कडे लेखी स्वरूपात द्यावे आम्ही त्या सरकार पर्यंत मांडून न्याय मिळवून देवू .मेळाव्यात अनेक मान्यवरांकडून समाज प्रबोधन असे भाषण झाले. अध्यक्ष: मा.श्री दशरथ पाटील हे होते.या कार्यक्रमात सर्व पक्षीय प्रमुख नेते,कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ते,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        गावठाण विस्तार, सिंमाकन वाढवणे,भूमिपुत्रांना भूमिहीन करणाऱ्या क्लस्टर सारख्या योजनांविरूध्द आवाज उठवून त्या रद्द करण्यात याव्यात, औद्योगिकीकरण करून स्थानिक भूमिपुत्र भूमिहीन होत चाललाय, वाढती बेरोजगारी,जातीनिहाय जनगणना व ओबीसी आरक्षण, नैना प्रकल्पातील स्थानिक भूमिपुत्राचे हक्क शेती,रेती ,बागायत, मिठागरे,मस्य व्यवसायधंद्यात वाढते परप्रांतीय टक्केवारी,विमानतळ नामकरण, पानथळ जमीनी (मॅग्रोस) जमिनीचे संरक्षण, उल्हास नदी पूर नियंत्रण रेषेबाबत जाचक सुधारणा अशा अनेक व्यापक प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
समाजावर होणारे अन्याय, वाढती बेरोजगारी, शिक्षण,भूमिपुत्राचे हक्क, जमिनीचे मुळ हक्क, समाज विकासाच्या विविध आव्हानावर चर्चा केली.मेळाव्यातील प्रमुख वक्त्यांनी समाजाच्या एकतेवर भर दिला आणि सांगितले आगरी समाजाने आपल्या हक्कासाठी आणि न्याय हक्कासाठी एकत्र आवाज उठवला पाहीजे. .समाजातील तरूण मंडळीने पुढे येऊन समाजासाठी काम केले पाहिजे.या कार्यक्रमाच्या समारोप सत्रात सर्व उपस्थित सदस्यांच्या वतीने एकजूट व अंखडेतेचे प्रतिक म्हणून एकत्र येण्याची प्रतिज्ञा केली.पक्षपात न करता समाजातील सर्व पक्षीय एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने सर्वत्र कौतुक होत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नेरे गावचा सुपुत्र गायक रवींद्र जाधव साई इंटरटेनमेंटच्या 'स्टार महाराष्ट्राचा' पुरस्काराने सन्मानित

गडब (अवंतिका म्हात्रे)एमसीयम टीव्ही आणि साईसागर आयोजित स्टार महाराष्ट्रचा पर्व १० वे पनवेल येथील २१ सप्टेंबर रोजी, आद्यक्रांतीवर वासुदेव बळ...