आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४

जिव्हाळा फाउंडेशनतर्फे रत्नागिरी जिल्हास्तरीय पर्यावरणपूरक मखर सजावट स्पर्धाचे आयोजन

मुंबई (शांताराम गुडेकर )कोकण आणि गणपती उत्सव हे एक समीकरण आहे आणि या कोकणामध्ये प्रत्येक वर्षी चातक पक्षांप्रमाणे वाट बघणारा गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाला घरांमध्ये भक्तीभावाने पूजन करत सुबक आरास सजवत असतो आणि विशेष म्हणजे विविध प्रकारे मकर सजावट करत असतो परंतु यावर्षी सामाजिक जिव्हाळा फाउंडेशनच्या वतीने असा एक उपक्रम राबवण्यात येणार आहे की रत्नागिरी जिल्हास्तरीय पर्यावरणपूरक मखर सजावट स्पर्धा आयोजित केलेली आहे.गणपती हे निसर्गाचेच रूप आहे आणि निसर्ग वाचला तर आपण अजून सुंदर जीवन जगू असा मेसेज देणारा गणराया. म्हणून आपण पर्यावरण पूरक सजावट स्पर्धेत भाग घेण्यासाठी खालील नंबरवरती सर्वांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या एक मिनिटाचे मखराचे व्हिडिओज खालील दिलेल्या नंबरवर पाठवावेत.
दिलीप नाचरे 8104022906 दिपक मादगे 8655247415 सचिन मटकर 7798163427 शैलेश धुमक 8169047520 रविंद्र गांगरकर 8652002016
गणेश चतुर्थीच्या दिवशीच्याच व्हिडिओ पाठवलेल्या स्पर्धकांचाच विचारविनिमय करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि यावरील स्पर्धेत जास्तीत जास्त जिल्ह्यातील गणेशभक्तांनी या स्पर्धेत भाग घ्यावा.असे आवाहन या संस्थेचे अध्यक्ष शैलेश गायकर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नेरे गावचा सुपुत्र गायक रवींद्र जाधव साई इंटरटेनमेंटच्या 'स्टार महाराष्ट्राचा' पुरस्काराने सन्मानित

गडब (अवंतिका म्हात्रे)एमसीयम टीव्ही आणि साईसागर आयोजित स्टार महाराष्ट्रचा पर्व १० वे पनवेल येथील २१ सप्टेंबर रोजी, आद्यक्रांतीवर वासुदेव बळ...