आंगवली (शांताराम गुडेकर )रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील मु.पो.आंगवली येथे श्री मार्लेश्वर देवालय (मठ )मंदिरात श्रावणी सोमवार निमित्ताने रविवारी नामस्मरण (श्रावणी एक्का )ला सुरुवात झाली.आज सोमवार या नामस्मरणची सांगता दिवस आहे.यानिमित्ताने विविध क्षेत्रातील(राजकीय, सामाजिक, शिक्षण, वैद्यकीय, प्रसार माध्यम, पर्यावरण, अध्यात्मिक)अनेक मान्यवर व्यक्ती यांनी या मंदिरला भेटी देत नामस्मरणमध्ये सहभाग घेतला.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार श्री.शेखरजी निकाम साहेब यांनी आज (दि. १२ ऑगस्ट २०२४) रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील मु.पो.आंगवली येथील श्री मार्लेश्वर देवालय (मठ )मंदिरात येऊन श्रावणी सोमवार निमित्ताने होणार्या नामस्मरणात भाग घेतला.यावेळी श्री मार्लेश्वर देवस्थान रिलीजस अँन्ड चॅरिटेबल ट्रस्ट आंगवली मंदिर पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.यानिमित्ताने महाप्रसादचेही आयोजन करण्यात आले. अनेक भक्तांनी याचा लाभ घेतला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
संघर्षातून राज्यभूषणपर्यंत झेप; सतीश आडूरकर यांना 'महाराष्ट्र राज्यभूषण पुरस्कार २०२६' प्रदान
कोल्हापूर: संघराज फाउंडेशन, सावर्डे (ता. हातकणंगले) यांच्या वतीने कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा