आंगवली (शांताराम गुडेकर ) रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील मु.पो.आंगवली येथे श्री मार्लेश्वर देवालय (मठ )मंदिरात श्रावणी सोमवार निमित्ताने रविवारी नामस्मरण (श्रावणी एक्का )ला सुरुवात झाली.आज सोमवार या नामस्मरणची सांगता दिवस आहे.यानिमित्ताने विविध क्षेत्रातील(राजकीय, सामाजिक, शिक्षण, वैद्यकीय, प्रसार माध्यम, पर्यावरण, अध्यात्मिक)अनेक मान्यवर व्यक्ती यांनी या मंदिरला भेटी देत नामस्मरणमध्ये सहभाग घेतला.आज वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. समूह अध्यक्ष प्रशांतजी यादव यांनी श्रावणी सोमवार एक्क्या निमित्त मंदिरात येऊन सह कुटुंब देवाचे दर्शन घेतले, तसेच भाविकांसाठी महाप्रसाद म्हणून त्याच उद्योगसमूहामध्ये प्रक्रिया झालेले श्रीखंड डबे अर्पण केले.यावेळी श्री मार्लेश्वर देवस्थान रिलीजस अँन्ड चॅरिटेबल ट्रस्ट आंगवली मंदिर पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.यानिमित्ताने महाप्रसादचेही आयोजन करण्यात आले. अनेक भक्तांनी याचा लाभ घेतला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
भांडुपकर डॉ सुरेश पाटील सर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान..
मुंबई - ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था, नाशिक या प्रतिथयश संस्थेतर्फे, गेल्या २१ वर्षांतील शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा