खरोखरच, विद्येचे माहेरघर असलेल्या रत्नागिरी जिल्हा - दापोली तालुक्यातील पालगड हे सुसंस्कृत ग्रामीण भागातील एक खेडे गाव असलेल्या साने गुरुजींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या जन्मभूमीतच " नव भारत हायस्कूल, मु. पो. जामगे ( ता . दापोली, जि . रत्नागिरी ) " असलेल्या १९८८ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण मनात सुचलेली संकल्पना हि तालुका, जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक हायस्कूलने एक आदर्श घ्यावा, अशी ही सुसंस्कृत परंपरा असून शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप कार्यक्रमामुळे सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून सर्व केळीच्या पानावरील दवबिंदू असलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सुद्धा गगनात मावेनासा झाला, यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांच्या तर्फे शाळेला श्री गणपतीचा फोटो फ्रेम देण्यात आले . प्रमुख मान्यवर व माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन केलेली दिपज्योतीची परंपरा अखंड तेजोमय तेवत राहावी, हा संदेश सर्व विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांकडून देण्यात आला . संपूर्ण कार्यक्रम भव्य दिव्य प्रमाणात यशस्वी करण्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक हातभार लावून सहकार्य केले असून हायस्कूलच्या व्यवस्थापनाने सुद्धा सहकार्य केले, त्यामुळे त्यांचे देखील आभार ! असे म्हणतात की, पिंपळपानाला जाळी पडली, तरी ते पान नष्ट होत नाही, तसेच ह्या कार्यक्रमाचा ऐतिहासिक सुवर्णक्षणाचे पान, साक्षीदार असलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या मनातून कधीही नष्ट होणार नाही, सेवेशी ठायी तत्पर , नव भारत हायस्कूल !!
सोमवार, १२ ऑगस्ट, २०२४
दापोलीमध्ये माजी विद्यार्थ्यांकडून शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप !
दापोली ( प्रतिनिधी) श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था - कोल्हापूर ( मान्यताप्राप्त ) " नव भारत हायस्कूल, मु .पो. जामगे ( ता. दापोली, जि. रत्नागिरी ) " १९८८ च्या बॅचतर्फे माजी विद्यार्थ्यांकडून राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर जयंतीचे औचित्य साधून नुकताच शालेय विद्यार्थ्यांना वह्या व शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेच्या प्रांगणात भव्यदिव्य प्रमाणात कार्यक्रम करण्यात आला, गेली एक महिनाभर शालेय विद्यार्थ्यांनी तयारी करून अप्रतिम असे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मुंबई, ठाणे, पुणे तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माजी विद्यार्थी ह्या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कातळवाडी गावच्या रहिवाशी सावित्री ह.कारकर यांचं दुःखद निधन ;संजय,अजय,आदित्य बंधुंना मातृशोक, कातळवाडीवर दुःखाचा डोंगर
मुंबई (प्रतिनिधी ) चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे कातळवाडी गावचे भूमिपुत्र व गावचे गुरव स्व.हरिश्चंद्र ता.कारकर यांच्या पत्नी सावित...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
कल्याण : गुरूवार दि.१५ आॕगस्ट २०२४ रोजी सरस्वती मंदिर पडलेगांव शाळेत या वर्षी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा