गडब(अवंतिका म्हात्रे) पेण तालुक्यातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या ,ग्रुप ग्रामपंचाय गडब मध्ये पैशांची चणचण भासू लागली आहे.सदर ग्रामपंचायतीला अपंग बांधवांना दिला जाणारा निधी पूर्णतः देण्यास सदर ग्रामपंचायत अपयशी ठरली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,ग्रुप ग्रामपंचायत गडब तर्फे दरवर्षी दिला जाणारा अपंग निधी यावर्षी देण्यास टाळाटाळ करू लागले आहेत.याबाबत प्रस्तुत वार्ताहराने गडबच्या सरपंच यांना दूरध्वनी वरून संपर्क साधला असता थातुर मातुर उत्तर देण्यात आले.आम्ही अपंग निधीसाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले.
याबाबत अपंग बांधवांशी संपर्क साधला असता,असे सांगण्यात आले की आमच्याकडुन वेळोवेळी सरपंचांना विचारणा करण्यात आल्याचे सांगितले.मात्र कोणतेही ठोस उत्तर देण्यात आले नाही.ग्रुप ग्रामपंचायत गडब ही पेण तालुक्यात सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत आहे.या ग्रामपंचायतीला जे एस डब्ल्यू जॉन्सन कडून करोडोंच्या निधी उपलब्ध होत असतो.मग हा निधी गेला कुठे? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडत आहे.गावात सुखसुविधांची वानवा दिसत आहे.तरीही ग्रुप ग्रामपंचायत गडबने अपंगांचा निधी स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर देण्यात यावा अशी मागणी समस्त गडब मधील अपंग बांधवांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा