आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४

वैभववाडी तालुका विकास मंच तर्फे तालुकास्तरीय घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन

मुंबई ( प्रतिनिधी) वैभववाडी तालुका विकास मंच संस्थेच्या माध्यमातून भव्य घरगुती गणेश सजावट स्पर्धा - २०२४ आयोजित करण्यात येत आहे. सदर स्पर्धा फक्त वैभववाडी तालुकास्तरीय आहे.विजेत्यां स्पर्धकांना पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल.
प्रथम क्रमांक : २००१/- ट्रॉफी + सन्मानपत्र, द्वितीय क्रमांक : १५०१/- ट्रॉफी + सन्मानपत्र, तृतीय क्रमांक : १००१/- ट्रॉफी + सन्मानपत्र, २ उत्तेजनार्थ ट्रॉफी + सन्मानपत्र तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र देणार.
   श्री गणेश सजावट स्पर्धेसाठी ७ सप्टेंबर ते १४ सप्टेंबरपर्यंत सहभागी होता येईल. स्पर्धेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे वगळून इतर सहभागी होऊ शकतात. गणेश मूर्ती शाडू माती, पर्यावरणपूरक इको फ्रेंडली असणे आवश्यक आहे. गणेश मूर्तीच्या ठिकाणी देखावे, चित्र यामध्ये नैसर्गिकता, पर्यावरणाचा उपयोग केलेला असावा. नोंदणी केलेल्या स्पर्धकांनी आपल्या घरगुती गणपतीचा सजावटीसहित फोटो आणि एक व्हिडिओ खालील व्हॉट्स ॲप नंबरवर, स्पर्धकाचे नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर सोबत पाठवावे.
    स्पर्धेच्या नियम आणि अटी खालीलप्रमाणे, १) सदर स्पर्धेसाठी कोणती ही प्रवेश फी नाही. २) सर्व सहभागी स्पर्धकांसाठी परिक्षकांनी दिलेला निर्णय अंतिम राहील. त्यात बदल होणार नाही. ३) स्पर्धेच्या नियमांमध्ये बदल करण्याचा अधिकार "स्पर्धा समितीकडे" असणार आहेत.
नाव नोंदणीसाठी विठ्ठल तळेकर -8879050769,सुरेश पाटील-9137903740, विठ्ठल मासये - 8879476044, चंद्रकांत रासम- 9920738510, श्रीकृष्ण सोनार -9619034824, नवलराज काळे -9307327434, योगेश आंब्रसकर -9930939636 यांच्याशी संपर्क साधावा.
    वैभववाडी तालुक्यातील जास्तीत जास्त गणेश भक्तांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन वैभववाडी तालुका विकास मंच संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मुंबईकरांच्या पाण्यासाठी जागतिक दर्जाचे अभयारण्य उध्वस्त करू नका : शिवक्रांतीचे अध्यक्ष शरद पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

ठाणे :  पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामधे मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी गारगाई धरण बांधण्याच्या हालचाली मोठ्या प्रमाणावर वेग घे...