आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ६ सप्टेंबर, २०२६

शिक्षक दिनानिमित्त नारायणगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांचा सन्मान

वासिंद(हर्षल शेलवले)-शिक्षक दिनानिमित्त शहापूर तालुक्यातील नारायणगाव येथील जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने ५ सप्टेंबर २०२६ रोजी नारायणगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
      या सोहळ्यात शाळेतील गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच स्वयंपाकी व मदतनीस यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
     यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सन्मानामुळे शिक्षकवृंदामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

शिक्षक दिनानिमित्त नारायणगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांचा सन्मान

वासिंद(हर्षल शेलवले)- शिक्षक दिनानिमित्त शहापूर तालुक्यातील नारायणगाव येथील जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने ५ सप्टेंबर २०२६ रोजी नार...