आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४

रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळ पोरकी झाली ; ग्रंथमित्र गजानन कालेकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने अकस्मित निधन

दापोली प्रतिनिधीः दापोली तालुक्यातील करंजाणी येथील *गजानन शंकर कालेकर यांचे हृदयविकाराने गुरूवार दि.२९ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता वयाच्या ७३व्या वर्षी निधन झाले.त्यांच्या अचानक जाण्याने रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळ पोरकी झाल्याची प्रतिक्रिया रत्नागिरी जिल्हाभरातून व्यक्त होत आहे.
        गजानन कालेकर हे ग्रंथालय चळवळीशी एकरूप झालेले व्यक्तीमत्व होते.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत ज्येष्ठ लिपिक म्हणून ते निवृत्त झाले होते.त्यांना वाचन आणि ग्रंथालय चळवळ यात विशेष आवड असल्याने नोकरी बरोबरच ग्रंथालय चळवळीतही त्यांनी कामाला सुरूवात केली होती.ग्रंथालये हेच कुटुंब मानून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ग्रंथालयांना लागेल ती मदत आणि मार्गदर्शन ते करत असत.रत्नागिरी जिल्ह्यात आज ग्रामीण भागात ग्रंथालय चळवळ वृद्धीगंत झाली त्यात त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे.जिल्ह्यातील अनेक ग्रंथालयाच्या उभारणीसाठी त्यांनी दिवस रात्र काम केले. 
     गजानन कालेकर हे अनेक संस्थांचे उर्जास्थान होते.रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे कोषाध्यक्ष,कोकण विभाग ग्रंथालय संघाचे सदस्य, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत होते.कोकण विभाग ग्रंथमित्र पुरस्कार, सर्वोत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.
     दापोली,खेड, मंडणगड,चिपळूण येथील सुमारे पंच्याहत्तर ग्रंथालयांच्या जडणघडणीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते. माजी सैनिकांना व त्यांच्या पश्चात वीरपत्नींना निवृत्तीवेतन प्राप्त करून देण्यात ते अग्रेसर होते. त्यांची लेखनशैलीही स्वभावानुसार तरल आणि अभ्यासू होती.अनेक वृत्तपत्र व मासिकांतून त्यांचे लेखन सुरू होते.
    आपल्या मूळ गावी करंजाणी येथे असलेल्या छत्रपती शिवाजी ज्ञानसंवर्धन मंडळाचे ते सचिव म्हणून काम पहात होते.करंजाणीतील परंपरागत टुमदार घरात एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ते रहात होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे,एक मुलगी,नातवंडे असा परिवार आहे.
      समाजातील प्रत्येक माणसाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रथम पुण्यस्मरण : कै.विष्णू शंकर पाटील

दोन ओळी बाबासाठी .... बाबा आमचे आधार स्तंभ हरवले .आज राहून राहून डोळ्यात पाणी येते .कोणालाही दुखवले नाहीत. नेहमीच हसत मुख जीवन जगलात ! नेहमी...