आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १२ फेब्रुवारी, २०२४

आमदारांनी फुकटचे श्रेय घेऊ नये

गडब(अवंतिका म्हात्रे) तालुक्यातील चिपळे ग्रामपंचायती अंतर्गत जलजीवन मिशन योजना राबवली जात आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या पाठपुराव्याने हे काम झाले असतानादेखील स्थानिक विलास फडके यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.
      दरम्यान, जलजीवन मिशन योजनेचे काही लोकांकडून श्रेय लाटण्याचे तसेच आर्थिक फायदा घेण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकताच केला होता. मात्र, सदर आरोप हा बिनबुडाचा असून, ज्या योजनेसाठी गेली तीन वर्षे पाठपुरावा केला, पदरचे पैसे खर्च केले, जनतेसाठी केलेल्या कामांचे कधी कुठे फलक लावले नाही की प्रसिद्धी घेतली नाही. मात्र, ज्यांनी ३-३ वर्षे पाठपुरावा केल्यानंतर त्याला श्रेय घेण्याचे अधिकार नाहीत का, असा उलट सवाल करीत विलास फडके यांनी आमदारांच्या आरोपांचा समाचार घेतला.
     यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्री. फडके यांनी सांगितले की, आमदार प्रशांत ठाकूर हे काही विघ्नसंतोषी कार्यकर्त्यांच्या ऐकण्यावरून ते आपली भूमिका मांडत आहेत. माझी एवढीच विनंती आहे, की प्रत्यक्षात या कामाच्या सुरुवातीपासून कोण कोण काम करीत आहे, याची योग्य माहिती घेऊन श्रेय कुणी घ्यावे हे ठरवावे. तसेच आजपर्यंत ग्रामपंचायत हद्दीतील एकाही नागरिकाकडून लोकवर्गणीपैकी एक रुपयाही जमा केला नसतानाही नाहक बदनामी करण्याचे षड्यंत्र स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वक्तव्यातून केलं जात आहे, असेही श्री. फडके यांनी म्हटले आहे.
विलास फडकेंनी लगावला टोला
आमदार मात्र आपल्या प्रयत्नामुळे काम झाल्याचे जनतेला खेटे सांगून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत असा टोला विहीघरचे माजी सरपंच तथा शेकापचे माजी जि.प. सदस्य

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गावदेवी चॅरिटेबल शेतकरी संघटना वर्धापन दिन साजरा!

मुंबई (सतिश पाटील): गावदेवी चॅरिटेबल संघटना( दिवे अंजुर भिवंडी ) ही गेली सात वर्ष अनेक उपक्रम राबवित आहेत. भूमिपुत्रांना न्याय म...