आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १२ फेब्रुवारी, २०२४

बोरसुत ग्राम विकास मंडळाचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

नवी मुंबई( सुभाष हांडे देशमुख ):  रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील बोरसुत गावातील मुंबई निवासी बोरसुत गाव विकास मंडळ, मुंबई या संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन भांडुप येथील सह्याद्री विद्यामंदिर च्या सभागृहात रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी उत्साही वातावरणात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात बोरसुत गावचे मानकरी सुभाष भाई खामकर सह सर्व उपस्थित ग्रामस्थांनी बोरसुत ग्रामदेवतेला आवाहन करून श्रीफळ वाढून केली. कुमारी लिना विनोद खामकर हिच्या गणेश वंदनाने सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रसंगी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रमही उत्साहात पार पडला. 
   कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे म्हणजे बोरसुत मधील ग्रामस्थांच्या मुलांनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन आपल्यातील कलागुणांना व्यक्त करुन कार्यक्रम अधिक बहारदार केला व उपस्थितांची शाबासकी मिळवली. 
    कार्यक्रमाचे अध्यक्ष मानकरी सुभाष श्रीपत खामकर व शिवाजी श्रीपत खामकर, ज्येष्ठ समाजसेवक अमृत सकपाळ, सरपंच चेतन दत्ताराम खामकर, उपसरपंच सौ. पल्लवी समीर खामकर, युवा नेते समीर दीपक खामकर , माजी सचिव महेश कदम, माजी सचिव मनोहर सिताराम खामकर, रविंद्र शिंदे, रवींद्र दौलत खामकर, रवींद्र जगन्नाथ खामकर व समाज सेवक भालचंद्र माने आदी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सन्मान नवीन कार्यकारिणी अध्यक्ष विलास निळकंठ खामकर, उपाध्यक्ष सलील सुभाष खामकर, सचिव सुशांत रमेश साळवी, खजिनदार प्रज्ञेश प्रभाकर खामकर यांनी केला. 
   या कार्यक्रमांतर्गतच दहावी, बारावी, पदवीधर, पदव्युत्तर आणि निवृत्त असलेल्या व्यक्तींचे सत्कार बॅग, प्रशस्तीपत्र, श्रीफळ, शाल आणि पुष्पगुच्छ उपस्थित मान्यवरांकडून देऊन करण्यात आले. बोरसुत गावची शान ढोल पथकातील विशेष कामगिरी ने प्रसिद्धी माध्यमांद्वारे पुढे आलेली कुमारी यामिनी नंदू खामकर हिचा उत्स्फूर्तपणे उपस्थितांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले.
    मान्यवर व्यक्तींनी मनोगत व्यक्त केले त्यात विशेष करुन नवीन कार्यकारिणीने एक उत्तम नियोजनबद्ध, सर्व समावेशक, सुंदर व आनंदी वातावरणात कार्यक्रम करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाबद्दल अभिनंदन केले. दहावी, बारावी , पदवीधर, पदव्युत्तर आणि निवृत्त असलेल्या व्यक्तींचा सन्मान म्हणजे ग्रामस्थांना आपला असलेला अभिमान हा इतरांना प्रेरणादायी ठरेल.
भालचंद्र माने यांनी आपल्या मनोगतात, गावापासून दूर राहणाऱ्यांनी गावात सातत्याने अधिकाधिक संख्येने येऊन गावातील परस्परांतील जिव्हाळा साध्य करून घ्यावा. असे सांगून त्यांनी सांगितले की, गाव हे आता पूर्वीसारखे राहिले नसून गावातील दळणवळणासह अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
    गावचे सरपंच चेतन खामकर, सौ पल्लवी खामकर युवा नेते समीर खामकर यांनी गावावरून येऊन त्यांनी कार्यक्रमात जाणीवपूर्वक उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच त्यांनी विश्वास दिला की बोरसुत गावांमधील पडीक जमिनीचा विकास, स्थानिकांना रोजगार, आरोग्य केंद्र, मोबाईल टॉवर अशा प्रकारचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविले जातील. अध्यक्ष विलास खामकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की आपला गाव तसा छोटा परंतु पंचक्रोशीतील उत्तम गाव म्हणून ओळखला जातो. विजय खामकर यांनी आपल्या मनोगतात आपल्या गावातील मुलांची उल्लेखनीय प्रगती पाहून आनंद व्यक्त केला. शिवाजी खामकर यांनी मंदिराची उभारणी हे सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याचे फळ आहे . असे सुचित करुन आम्ही निमित्त मात्र आहोत. असा विचार व्यक्त केला. 
   वार्षिक स्नेहसंमेलन आपली संस्कृती ग्रामदेवतेला श्रीफळ सह आवाहनानंतर, महिलांचा सन्मान हळदीकुंकू समारंभाने नवीन पिढीने कार्यक्रम सुंदर करण्यास लक्ष दिले. श्रीया, स्वानंदी, लीना, दिव्या, सोहम, पार्थवी या मुलामुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. त्यांना कार्यकारिणीने ट्रॉफी देऊन त्यांना शाबासकी दिली. उपाध्यक्ष सलील खामकर यांनी ग्रामस्थांच्या बहुसंख्येने उपस्थिती बद्दल आभार व्यक्त केले. तसेच राजेश खामकर व नरेश खामकर यांनी उत्तम अँकरिंग केले, गावचे अक्षय सुतार यांनी उत्कृष्ट बॅनर बनवून दिला. रवींद्र सावंत यांनी हॉल उपलब्ध करून दिला. अशा सर्वांचे आभार व्यक्त करत अगोदरच्या कमिटीतील कै. सुरेश खामकर, श्रीकांत खामकर, प्रमोद साळवी, विवेक खामकर, मनोज माने इत्यादी उल्लेखनीय कार्य करणारे सर्वांचा नामोल्लेख करुन सर्वांचे यथोचित आभार मानले. उत्साही जोश पुर्ण आवाजात महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गावदेवी चॅरिटेबल शेतकरी संघटना वर्धापन दिन साजरा!

मुंबई (सतिश पाटील): गावदेवी चॅरिटेबल संघटना( दिवे अंजुर भिवंडी ) ही गेली सात वर्ष अनेक उपक्रम राबवित आहेत. भूमिपुत्रांना न्याय म...