नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख) : रोटरी क्लब चेंबूर मुंबई आणि आरसीएफ एक्स एम्प्लॉइज सोशल फोरम च्या सहकार्याने आपले मानवाधिकार फाउंडेशनने दिनांक २ फेब्रुवारी २०२४ रोजी वाडा, विक्रमगड तालुक्यातून त्र्यंबकेश्वर तीर्थयात्रेस पायी जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील खोडाळा या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करुन वारीत सामील झालेल्या भाविकांना वैद्यकीय सेवा पुरवून मदतीचा हात तर दिलाच त्याचबरोबर त्यांच्यातील उत्साह अधिक द्विगुणीत केला. मानव सेवेचा एक आदर्श समाजमनात जागवला. या वैद्यकीय शिबिराचा सुमारे बाराशे गरजू वारकऱ्यांनी लाभ घेतला.
षट्तिला एकादशी (पौषवारी) (दिनांक ६.२.२४) या तिथीला संतश्रेष्ठ संत निवृत्तीनाथ महाराज त्रंबकेश्वर येथे समाधीस्थ झाले. त्या दिवसाचं पावित्र्य राखण्यासाठी अनेक ठिकाणावरून वारकऱ्यांच्या दिंड्या दरवर्षी त्रिंबकेश्वर येथे येत असतात. मोठ्या यात्रेचे स्वरूप या सोहळ्यास येते.
हे शिबिर यशस्वी होण्यासाठी डॉ. गणेश उमराटकर, डॉ. अमित शर्मा, डॉ दीपेश पष्टे तसेच किरण पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला तर आरसीएफ एक्स एम्प्लॉइज सोशल फोरम मुंबई, रोटरी क्लब चेंबूर व आरसीएफ हॉस्पिटल चेंबूर यांनी शिबिरात लागणारी औषधे उपलब्ध करुन देऊन या राष्ट्रीय कार्यास सक्रिय हातभार लावला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा