गोवा/मडगाव (महेश्वर तेटांबे) १६ वा राष्ट्रीय युवा फुटबॉल स्पर्धा नुकतीच गोव्यात मडगाव या ठिकाणी संपन्न झाली. यांत महाराष्ट्राच्या जे जे हॉस्पिटल रुग्णालय कर्मचारी संघाने बाजी मारून आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चुरशीच्या ठरलेल्या महाराष्ट्र आणि हरयाणा यांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या प्रवीण सोलंकीने पहिल्या हाफमध्ये पहिला गोल केला आणि दुसऱ्या हाफमध्ये कौशिक सोलंकीने गोल करून हरयाणाला पराभूत करून महाराष्ट्राला आघाडी मिळवून दिली. प्रशिक्षक तुषार चौहान आणि छगन चौहान यांनी आपल्या महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय विजेतेपद मिळवून देण्यासाठी विशेष मेहनत घेतली. महाराष्ट्रातील जे जे हॉस्पिटल रुग्णालय संघाच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे सर्व खेळाडूंचे आणि प्रशिक्षकांचे विशेष कौतुक होत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
संकल्प संस्थेच्या वतीने पॅरा कौन्सिलिंग कोर्सचा शुभारंभ ; मानसिक आरोग्य क्षेत्रासाठी प्रशिक्षित समुपदेशक घडविण्याचा संकल्प
मुंबई दि. २२ (अधिराज्य) वाढत्या मानसिक तणाव, कौटुंबिक संघर्ष आणि सामाजिक समस्यांच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षित समुपदेशकांची गरज ओ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा