आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०२४

गुरुकुल कॉलेज ऑफ कॉमर्स येथील महिला विकास समिती व क्रिडा विभागाच्या वतीने ३ दिवसीय आत्मसंरक्षण प्रशिक्षिण शिबिर संपन्न ; 'अरबन फिटनेस' च्या मुख्य प्रशिक्षका निकिता दांडेकर तसेच क्रिडा प्रशिक्षक संकेत कांबळे यांनी १५० विद्यार्थीनींना / युवतींना आत्मसंरक्षणचे दिले प्रशिक्षण

मुंबई (शांताराम गुडेकर )
             गुरुकुल कॉलेज ऑफ कॉमर्स येथील महिला विकास समिती व क्रिडा विभागाच्या वतीने ३ दिवसीय आत्मसंरक्षण प्रशिक्षिण शिबिर नुकतेच पार पडले.अरबन फिटनेस, वरळी, येथील प्रशिक्षकांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण सर्व युवतींना दिले गेले.आत्मसंरक्षण प्रशिक्षणाचे हे सामाजिक कार्य करत असल्यामुळे समाजात महिला व युवतींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये नक्कीच घट होईल आणि महत्त्वाचे म्हणजे शासनावर तसेच पोलिस प्रशासनावर येणारा अतिरिक्त ताणतणाव देखील कमी होण्यास मदत होईल. 'आत्मसंरक्षण' हे काळाची गरज आहे.गरज ओळखून अशी शिबीर प्रत्येक विभागात होणे आवश्यकत आहे.समाजात वावरणाऱ्या विघातक प्रवृत्ती पासून स्वतःचा तसेच आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी या प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे.मुंबई विद्यापीठाच्या परिपत्रकाप्रमाणे प्रत्येक महाविदयालयात महिला विकास समिती (WDC) अंतर्गत सर्व महाविदयालयीन युवतींच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारचे शिबिर राबवणे गरजेचे आहे.या प्रशिक्षणासाठी महाविदयालयातील सुमारे १५० विद्यार्थीनीनी यामध्ये सहभाग घेतला. 
            'अरबन फिटनेस' च्या मुख्य प्रशिक्षका निकिता दांडेकर तसेच क्रिडा प्रशिक्षक संकेत कांबळे यांनी सलग ३ दिवस गुरुकुल महाविदयालयातील विद्यार्थीनींना / युवतींना आत्मसंरक्षण याचे प्रशिक्षण दिले.या प्रशिक्षणात वाईट कृत्यांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या खूप लहान लहान व अतिशय सहज व महत्त्वाच्या युक्त्या शिकवून त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करवून घेतले.मार्शल आर्टस् व क्रिडा प्रशिक्षिका निकिता दांडेकर यांनी युवतींना स्वःताचा बचाव करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या युक्तीबाबत असणाऱ्या अनेक शंकांचे निरसन केले. तसेच या माध्यमातून विद्यार्थीनींना सदैव सतर्क राहण्याचे आवाहन केले. विद्यार्थीनींचा आत्म- विश्वास वाढवून त्यांना शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी, सुदृढ व सशक्त राहण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी गुरुकुल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.ममता राणे, महिला विकास समिती प्रमुख संयोजिका कांचन लोतले, महिला विकास समितीचे सदस्य आणि स्वयंसेवक यांचे देखील सहकार्य लाभले.गुरुकुल महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी असेच उपक्रम सतत राबविण्याचा ठाम निश्चय दर्शवला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

व्यसनमुक्ती पथनाट्य स्पर्धेत विवेकानंद कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स ॲण्ड कॉमर्स प्रथम, नेरुळचे एस आय इ एस महाविद्यालय दुसऱ्या तर डी वाय पाटील स्कूल ऑफ फार्मसी तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी

प्रथम विजेता संघ नवी मुंबई : अन्वय व्यसनमुवती केंद्र आणि नशाबंदी मंडळ - महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. बाबासा...