मुंबई (शांताराम गुडेकर ) चेंबूर विभागातील वाशी ग्राम सेवा मंडळतर्फेवाशी गाव, चेंबूर, मुंबई -७४ येथे माघी गणेश जन्मोत्सवचे आयोजन दि.९ फेब्रुवारी २०२४ ते १३ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत करण्यात आले आहे.मंडळ अध्यक्ष मा. नगरसेवक माणिक पाटील, उपाध्यक्ष- प्रकाश पाटील, सचिव -धनंजय ठाकूर, खजिनदार -अनंता गावंड, कार्या अध्यक्ष सदानंद पाटील, सह सचिव -प्रदीप गावंड, बाळकृष्ण पाटील, हिशोब तपासणीस - अशोक पाटील, सदस्य -रोहन पाटील, अनंत पाटील, विजयानंद भोईर, दिलीप पाटील, रविंद्र पाटील, रमेश पाटील आणि सर्वं पदाधिकारी, सदस्य आणि सभासद हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. उद्या शुक्रवारी सकाळी १० वा.पासून संकल्प आणि श्री गणेश पूजन, स्थळ सुद्धीकरण, पुण्यहवाचन, कुलदैवत पूजन, नांदी स्मरण, रक्षा मंत्रहवन, श्री गजानन बीज मंत्र हवन, पूर्णाहुती तर दुपारी १ वा. आरती,६ ते ८ वा जप नाम स्मरण होणार आहे. शनिवार व रविवारीही सकाळ पासून विविध कार्यक्रम होणार आहेत. रविवारी श्री गणेश, श्री गनोबा देव, श्री गावदेवी माता या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा व नूतन मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे. तर १३ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रति वर्ष प्रमाणे माघी गणेश जन्मोत्सव साजरा होणार आहे. सकाळी ७ ते ९ वा. श्री गणेशाची षडशो.पूजन, ९ते ११ वा. होमहवन,११-३० तीर्थप्रसाद,१२-३० ते २-३० वा. महाप्रसाद, भंडारा,३ ते ५ विद्यार्थी वर्गाच्या क्रिडास्पर्धा तसेच महिलांसाठी हळद -कुंकू कार्यक्रम आणि रात्री ७ वा. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच प्रमुख पाहुणे यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण होणार आहे. या कार्यक्रमला प्रमुख पाहुणे म्हणून मा. एस.सी मुडगेरीकर (अध्यक्ष /व्यवस्थापकीय संचालक आर. सी.एफ ), ऍड. सुबोध आचार्य (उप नेता शिवसेना (उ.बा.ठा.), प्रमोद शिंदे (विभाग प्रमुख -शिवसेना(उ.बा.ठा), शिवसेना आमदार (उ. बा. ठा )प्रकाश फातर्पे कर, नगरसेवक श्रीकांत शेट्टे आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. तरी विभागातील सर्वं नागरिकांनी या सर्व कार्यक्रमचा लाभ घ्यावा असं आवाहन वाशी ग्राम सेवा मंडळतर्फे करण्यात आले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
मराठा–ओबीसी आरक्षण प्रकरणात ‘शिवा संघटने’कडून उच्च न्यायालयात जनहित याचिका
उरण (विठ्ठल ममताबादे )मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामावून घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाने दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेला शासन निर्णय ता...
-
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा