गडब (अवंतिका म्हात्रे) पेण तालुक्यातील कोलेटी गावात मोठ्या प्रमाणात विकास कामाच च्या नावाखाली शासनाची मोठी फसवणूक झाली आहे .कोलेटी हददी मध्ये तलावातून गाळ काढणे या बाबत कोणत्याही प्रकारे चौकशी न झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ढमा जोशी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे .
महात्मा गांधी रोजगार हमी योजना राबविण्यात आली .मात्र त्या योजनेत कोणत्याही प्रकारे तारतम्य नसल्याचे दिसून आले .खेळासाठी क्रीडांगण,सभा मंडप,यांचीही जागेवर जाऊन चौकशी करणे क्रमप्राप्त होते .मात्र तसे करण्यात आलेले नाही.वार्षिक सन 2023 ते 2027 जी विकासाच्या दृष्टिकोनातून कामे होणार आहेत, त्या कामात आपले लक्ष असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.सन 2018 ते 22 च्या कामाबद्दल मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे तात्काळ कारवाई करण्यात यावी .तसेच विषय मंजूर शेतकरी उदरनिर्वाह करीत असलेले शेतकरी व मोलमजुरी करीत असलेल्या ग्रामस्थांना घर खर्च चालवण्यासाठी शासनाने केलेला उपाय म्हणजे महात्मा गांधी रोजगार हमी योजना जर काही रोजगार हमी योजना राबवीत असताना शासनाने दिलेले ईश्रमकार्ड माध्यमातून जर रोजगार मिळत नसेल तर इ श्रम कार्डचा काही उपयोग होणार नाही .या सर्व बाबींचा विचार करून सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जोशीसर्व मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 29 / 2 /2024 रोजी रोजी रायगड जिल्हा कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा