आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०२४

अखिल भारतीय मराठा महासंघाचा धन्वंतरी पुरस्कार कृष्णा कदम याना प्रदान ;मनोज जरांगेच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

घाटकोपर (शांताराम गुडेकर )कृष्णा मारुती कदम यांना यंदा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने धन्वंतरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कृष्णा कदम हे सामाजिक क्षेत्रात आणि वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने कोकणातील सर्वसामान्य रुग्णांसाठी सेवाकार्य करत आहेत. कोरोनाच्या महामारीनंतर कृष्णा कदम यांनी कोकणातील रुग्णांचे हाल आणि त्यांच्या समस्या ओळखून एक वर्षापूर्वी मुंबईत वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करत रुग्णांसाठी मदत कार्य सुरू केले. ग्रामीण भागातील रुग्णांना शहरातील रुग्णालयात तातडीने उपचार व्हावे यासाठी त्यांनी कक्षाच्या माध्यमातून रुग्णालय क्षेत्रातील कर्मचारी , डॉक्टर याना एकत्र जोडत या कार्याला एक वेगळी स्वरूप दिले. आता पर्यंत दीड हजारहून अधिक रुग्णांना या कक्षाची मदत झालेली असून 50 हून अधिक दिव्यागाना कृत्रिम हात , पाय देऊन त्यांना स्वबळावर उभ राहण्याची प्रेरणा सुद्धा कृष्णा कदम यांनी दिली आहे त्यांच्या या अविरत सेवा कार्याला अखिल भारतीय मराठा महासंघाने धन्वंतरी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मराठा महासंघाचे संस्थापक माजी अध्यक्ष शशिकांत पवार उर्फ आप्पा यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त बुधवारी दादर शिवाजी मंदिर हॉल येथे विशेष पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्रातून दोन पुरस्करकर्ते निवडले गेले होते. सदर पुरस्कार राष्ट्रीय नेते राजेश टकैत, मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे, संघाचे अध्यक्ष दादासाहेब जगताप , विधानपरिषद आमदार भाई जगताप यांच्या हस्ते कृष्णा कदम यांना 25 हजार रोख रक्कम आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

"मराठमोळं मुलुंड" संस्थेचा ११ वा वर्धापन ; स्वर झंकार” मराठी- हिंदी संगीत संध्या" कार्यक्रमाचे आयोजन व विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांचा होणार सन्मान !

मुंबई: "मराठमोळं मुलुंड" संस्थेचा ११ व्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन शनिवार दिनांक १३ सप्टेंबर  रोजी संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत म...