आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १२ फेब्रुवारी, २०२४

नालासोपारा विरार रहिवाशी पंचक्रोशी मंडळ दाभोळतर्फे महिला हळदीकुंकू व स्नेहसंमेलन संपन्न

मुंबई(दीपक मांडवकर /शांताराम गुडेकर ) महाड तालुक्यातील दाभोळ पंचक्रोशीतील नालासोपारा विरार रहिवाशी पंचक्रोशी मंडळ दाभोळ यांचा महिला हळदीकुंकू व स्नेहसंमेलन कार्यक्रम डीवाईन हायस्कूल विजय नगर नालासोपारा पूर्व येथे रविवारी (११ फेब्रुवारी ) मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
     यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सुधाकरजी अडखळे, श्रध्दा ताई जाधव, डॉ. संजयजी जाधव, दीपक मांडवकर (पत्रकार), व अन्य वीस ते पंचवीस मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.तर मंडळाचे अध्यक्ष संतोषजी अडखळे यांनी प्रथम देणगीदार, महिला मंडळ,सर्व सदस्य व मान्यवर यासर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल वाडकर यांनी उत्तम रित्या केले.प्रमुख पाहुण्यांनी मंडळाचे कौतुक केले.
            तर श्रद्धाताई जाधव यांनी हळदी कुंकू आणि तिळगुळ यांचे महत्त्व महिलांना पटवून दिले. सर्व पहिला मंडळीसाठी मंडळाच्या वतीने वस्तू ठेवण्यात आली होती. तर सर्वांनी आनंदात स्नेहभोजन केले. हे मंडळ प्रामुख्याने दर वर्षी विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते. विद्यार्थी गुणगौरव सोहळा असो वा विद्यार्थी मार्गदर्शन सोहळा, आरोग्य शिबीर, सामाजिक उपक्रम व खास करून वैद्यकीय उपचार सहकार्य असी मंडळाच्या वतीने समाजसेवा घडत असल्याने खास करून या मंडळाच्या कार्यकारणीच्या पाठीवर संपूर्ण महाड दाभोळ पंचक्रोशी मध्ये सर्वांची कौतुकाची थाप यांच्यावर पडत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय एकात्मता दिन, सरदार पटेल जयंती ,हिंदु रत्न पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई:( सुनील इंगळे): समर्पित भावनेने विविध क्षेत्रात निरपेक्षपणे कार्य करणाऱ्या सेवाव्रती कार्यकर्त्यांना सरदार पटेल हिंदू रत्न...