मुंबई (शांताराम गुडेकर) महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवा भावी संस्था ( रजि.)या संस्थेच्या माध्यमातून दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ ते २२ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान ५ दिवसीय शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. संस्थेचे हे पाचवे वर्ष आहे.५ दिवशीय उत्सवाच्या आयोजनाचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे विचार प्रत्येक घरा घरात पोहोचावेत . याकरीता वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा , चित्रकला स्पर्धा याचे ऑनलाईन आणि ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये ऑफलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आलेले आहे,ज्या व्यक्तींना या स्पर्धेत ऑनलाइन पद्धतीने सक्रियतेने सहभाग नोंदवायचा आहे ,त्यांनी संस्थेच्या अधिकृत Email id ajinkyayuvaprathishthan@gmail.com वर आपली चित्रित केलेली व्हिडीओ , चित्र,निबंध दिनांक १७/२/२०२४ पूर्वी पाठऊन द्यावीत व संस्थेच्या सदस्यांशी संपर्क साधावा ही विनंती.शिवजयंती निमित्त खालील विविध विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.चित्रकला स्पर्धा -
5 वी ते 8 वी विषय -१) शिवाजी महाराज्याचे गडकिल्ले२) शिवाजी महाराज्याचे कोणताही एक ऐतिहासिक प्रसंग तर वक्तृत्व स्पर्धा-
इयत्ता 5 वी ते 9 वी -1) रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज 2) आज शिवाजी महाराज असते तर आणि निबंध स्पर्धा- (ओपन गट )
1) आजची तरुण पिढी आणि शिवाजी महाराज 2) छत्रपती शिवाजी महाराज्याची युद्ध नीती 3) आज शिवाजी महाराज असते तर आणि वक्तृत्व स्पर्धा- (ओपन गट)1) शिवाजी महाराज्याची महिलाविषयक धोरणे
2) आजची तरुण पिढी आणि शिवाजी महाराज 3)अंधार फार झाला , आता दिवापाहिजे राष्ट्राला पुन्हा एकदा,जिजाऊंचा शिवबा पाहिजे असे विषय आहेत. यासाठी
नियमावली-1) वक्तृत्व स्पर्धेत सहभागी स्पर्धकानी फक्त विषयाला अनुसरून 10 मिनिटांत आपला विषय मांडावा त्याच्या वर वेळ गेल्यास स्पर्धकास बाद ठरवण्यात येईल .
2) कोणत्याही स्पर्धकांनी जाती वाचक , धर्मा विरोधात बोलू नये अन्यथा त्या स्पर्धकाला बाद ठरवण्यात येईल .3) आपण पाठलेली व्हिडीओ चे मार्क 60 % परिक्षकान वर अवलंबून असतील आणि 40 % मार्क संस्थेच्या अधिकृत युट्युब चॅनल वर पाठवण्यात आलेल्या युट्युब वरील कमेंट आणि व्हीव वर अवलंबून असेल.4) कार्यक्रमात बदल करण्याचा अधिकार आयोजकांन वर राहील.5) स्पर्धकांनी आपली व्हिडीओ , निबंध , चित्र 17 फेब्रुवारी 2024 पूर्वी पाठवावी अशी आहे.विजेत्या स्पर्धकांना संस्थेच्या माध्यमातून खालील प्रमाणे बक्षीस देण्यात येईल.प्रथम क्रमांक =प्रशस्तीपत्रक +सन्मानचिन्ह ,द्वितीय क्रमांक = प्रशस्तीपत्रक + सिल्व्हर मेडल,तृतीय क्रमांक = प्रशस्तीपत्रक + ब्राँझ मेडल असेल. तरी ज्या शाळा,महाविद्यालय ,स्थानिक मंडळ आणि स्वतः एखाद्या व्यक्तीस वरील उपक्रमात सक्रिय तेणे सहभाग नोंदवायचा आहे, त्यांनी -निलेश कुडतरकर- 8693008261
प्रसाद मांडवकर -: 9768637534,गौतम बनसोडे -: 8424895791,स्वाती गावडे -:8879991605,अनंत जोशी -: 9821385850,साईनाथ खांबकर -: 9920371228 ,रंजिता सावंत -: 9022766278,विशाल शेट्टे -8104347929 ,अमित राणे - 9892066914 या व्यक्तीशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा