आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १२ फेब्रुवारी, २०२४

राष्ट्रीय छात्र सेना (एन सी सी) दिन साजरा

मुंबई(गणेश हिरवे) या वर्षी ८ फेब्रुवारी ला राष्ट्रीय छात्र दिन म्हणजेच एन सी सी दिवस कुर्ला गांधी बाल मंदिर शाळेत मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा झाला.यावेळी अमृत महोत्सवी छात्र सेना दिनासाठी सुरेख अशी रांगोळी पालक कविता केसरकर यांनी काढली होती.यावेळी एन सी सी कॅडेटस, आर. एस.पी,स्काऊट गाईड यांची शिस्तबध्द संचलन, मनमोहक रायफल ड्रिल, लेझिम, मुलींनी सादर केलेली देशभक्तीपर गीते, नृत्य, वाहतुकीचे नियम, याबद्दल मार्गदर्शन, कवायती, मानवी मनोरे, पथनाट्य, युद्धावर आधारित सेक्शन अटॅक, जवानांना श्रद्धांजली आदी कार्यक्रम सादर करण्यात आले.
    कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सी के टी कॉलेज चे कॅप्टन उद्धव भंडारे, श्री.रुपेश साळवी , शाळेचे मुख्यध्यापक अनिल पांचाळ, पर्यवेक्षक रवींद्र खोंडे, शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळेतील शिक्षक अमोल जागले, अवधुत चव्हाण, घनश्याम जोशी, अर्चना सातपुते, या शिक्षकांनी कार्यक्रमात प्रत्यक्ष भाग घेणाऱ्या विद्यार्थ्याना खूप छान ट्रेन केल होत. सूत्रसंचालन शिक्षिका अर्चना जाधव यांनी केलं तर संपूर्ण कार्यक्रमाची आखणी नियोजन शाळेतील शिक्षक एन सी सी ऑफिसर विश्वनाथ पांचाळ सर यांनी खूप मेहनत घेऊन केल्याचं दिसून आल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय एकात्मता दिन, सरदार पटेल जयंती ,हिंदु रत्न पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई:( सुनील इंगळे): समर्पित भावनेने विविध क्षेत्रात निरपेक्षपणे कार्य करणाऱ्या सेवाव्रती कार्यकर्त्यांना सरदार पटेल हिंदू रत्न...