🌸🌸 ‘वेध तुझ्या दर्शनाचे’🌸🌸
(काव्य प्रकार-अष्टाक्षरी)
➖➖➖➖➖➖➖➖
माघ मास उगवता
येते गणेशाची स्वारी
करू स्वागत बाप्पाचे
येता गजानन द्वारी..१
बाल- गोपाळ नाचती
सडा रांगोळ्या काढती
पोरं मखर करिती
गाती गणेश आरती..२
रांगोळ्यांचे प्रदर्शन
नैवेद्यांची ती आरास
ध्वज-पताका बांधणी
घर बाप्पाचे निवास..३
असे देवता बुध्दिची
भाव पहा रे मनाचे
बाप्पा तूच मायबाप
वेध तुझ्या दर्शनाचे..४
करू लाडक्या बाप्पाचे
दीड दिवस पूजन
फेडू नवस भक्तीने
गाऊ आरती भजन..५
------------------------------------------
नवनाथ ठाकुर-खिडकाळी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा