आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०२४

गोरेगाव येथे संकल्प माघी गणेश उत्सव उत्साहात संपन्न!

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील, संकल्प सहनिवास फेडरेल सोसायटीच्या वतीने 15 वा माघी गणेशोत्सव उत्साहात संपन्न झाला.पहाटे पासून गणेश अभिषेकास सुरुवात झाली. गणेश याग व होम हवन, अथर्व शीर्ष पठन करण्यात आले.
दुपारी गणेश जन्म सोहळा संपन्न झाला, त्यात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
सत्यनारायन पुजे नंतर सोसायटीत ढोल ताशाच्या व गणपती बाप्पाच्या गजरात पालखी काढण्यात आली.
       सकाळ पासून नागरी निवरा, संतोष नगर, गोकुळधाम, वाघेश्वरी, म्हाडा वसाहतीतील असंख्य गणेश भक्तांनी गणेश दर्शन करून घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.
        संकल्प फेडरेल सोसायटी, सांस्कृतिक मंडळ व महिला मंडळाचे मुख्य पदाधिकारी, चंद्रकांत माने, हनुमंत सुळे, राहुल गांगुर्डे, अजय पवार, ज्योती माने, मनिषा अमरे यांच्या आयोजनाने व सर्व सभासदाच्या,अहो रात्र प्रयत्नाने गणेशोत्सव उत्साहात संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पेण येथे दोन दिवसीय रेकी शिबिराचे आयोजन

पेण (प्रतिनिधी): वैश्विक उर्जेद्वारे स्वतःला शक्तीमान बनवा, मनोवांच्छित मिळवा. 'रेकी' हा जापनीज शब्द आहे. 'रे' म्हणजे '...