आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, १४ फेब्रुवारी, २०२४

बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

मुंबई दि. १४ (अधिराज्य) विवाहेच्छूक तरुण तरुणींना विवाहाच्या पवित्र बंधनात बद्ध करण्यासाठी सालाबादप्रमाणे याही वर्षी बौद्धजन पंचायत समिती संलग्न विवाह मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार दि. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई - १२ येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले आहे.
  सदर मेळाव्याचे उदघाटन कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांच्या हस्ते होणार असून, उपसभापती विनोद मोरे, माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. सदर प्रसंगी सरचिटणीस राजेश घाडगे हे सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार असून विवाह मंडळ अध्यक्ष तुकाराम घाडगे प्रस्ताविक सादर करतील, आभार प्रदर्शन विवाह मंडळ चिटणीस अतुल साळवी करतील तसेच उपकार्याध्यक्ष अशोक कांबळे (कणगोलकर), एच. आर. पवार (धामणकर), मनोहर मोरे, चंद्रमणी तांबे, अंकुश सकपाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सदर वधु वर परिचय मेळाव्यास नवीन सभासदांस नोंदणी शुल्क रु. ५०० आकारले जाणार असून विवाहेच्छूक तरुण तरुणी व त्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यासह उपस्थित राहून मेळाव्याची शोभा वाढवावी असे आवाहन बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात सरचिटणीस राजेश घाडगे व कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संजय दिना पाटील यांच्या पाठपुराव्याला यश, भांडुप स्टेशन परिसर होणार मोकळा, बेस्ट चौकीच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन संपन्न

मुंबई (प्रतिनिधी): भांडुप रेल्वे स्थानक मार्गावरील वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय व वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ...