आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, १४ फेब्रुवारी, २०२४

भन्ते विमल बोधी आणि भिक्खु संघाचे निवृत्त आर्मी सैनिक सुनील जाधव यांच्या वतीने भव्य स्वागत

गुहागर दि. १३ (अधिराज्य) तथागत गौतम बुद्ध यांनी दिलेल्या धम्माचा प्रचार आणि प्रसार या उदात्त विचाराने भन्ते विमल बोधी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली श्रामनेर भिक्खु संघ गावोगावी पायी जाऊन धम्मदेसना देत धम्मप्रचार करीत आहेत त्याचे औचित्य साधून कर्तव्यनिष्ठ निवृत्त आर्मी सैनिक आणि बौद्धजन सहकारी संघाचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी पूजनीय भन्ते विमल बोधी आणि त्यांच्या श्रामनेर भिक्खु संघास मौजे जानवळे, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी येथे भोजनदान आणि अठ्ठपरिस्कार दानाचे आग्रहाचे आमंत्रण दिले, त्या विनंतीस मान देऊन भन्ते विमल बोधी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली श्रामनेर भिक्खु संघाचे मौजे जानवळे येथे आगमन झाले, सुनील जाधव यांनी भन्ते विमल बोधी आणि श्रामनेर भिक्खु संघाचे चैतन्यमयी वातावरणात भव्यदिव्य स्वागत केले.

पूज्य भन्ते विमल बोधी यांनी बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांवर व त्रिरत्नांस शरण जाण्यासाठी अवलंबन्यात येणाऱ्या त्रिशरन यावर व सध्याच्या काळात जगाला धम्माची असलेली गरज व त्यानिमित्ताने आपले अंगीकरावे असे आचरण यावर धम्मदेसना दिली तसेच निवृत्त आर्मी सैनिक सुनील जाधव हे सैन्यदलात कार्यरत असताना जीवन देशाला समर्पण केले तर सेवानिवृत्तीनंतर समाजाला समर्पण केले आजही न थकता ते कार्यरत आहेत म्हणून त्यांचे कौतुक केले तसेच योगायोगाने त्याचदिवशी सुनील जाधव यांचा वाढदिवस असल्याने त्यांना वाढदिवसाच्या मंगल कामना ही दिल्या, तद्नंतर भन्ते विमल बोधी आणि भिक्खु संघास भोजनदान व अठ्ठपरिस्कार दान देऊन त्यांच्या मंगलकामना घेण्यात आल्या, सरतेशेवटी अध्यक्ष सुनील जाधव यांनी भन्ते विमल बोधी, भिक्खु संघास व उपस्थित उपासक, उपासिकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संजय दिना पाटील यांच्या पाठपुराव्याला यश, भांडुप स्टेशन परिसर होणार मोकळा, बेस्ट चौकीच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन संपन्न

मुंबई (प्रतिनिधी): भांडुप रेल्वे स्थानक मार्गावरील वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय व वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ...