🌸🌸गणपतीची आरास🌸🌸
गणेश जयंतीला पूजन करूया।।
मनोभावे  गणेशाला  स्मरूया।।धृ।।
अंगणात सडा-रांगोळी काढू
पाना - फुलांचे  तोरण  बांधू
झेंडूच्या फुलांनी मखर सजवूया।।
मनोभावे    गणेशाला   स्मरूया।।१।।
गणेश मूर्तीला वस्त्रे घालू
उपरणे नेसवु रंगीत शालू
सुवर्ण मुकूट परिधान करू या।।
मनोभावे  गणेशाला  स्मरूया।।२।।
लाल,पिवळी,हिरवी,निळी
लाईट लावूया  येथे वेगळी
गणपतीची आरास सुंदर करूया।।
मनोभावे    गणेशाला   स्मरूया।।३।।
तोरण, कंदील,पताका लावू
चला,गणेशाची आरती गाऊ
कृतज्ञतेने देवाचे पांग फेडू या।।
मनोभावे  गणेशाला स्मरूया।।४।।
मोदक,करंज्या, पेढे,लाडू
नैवेद्य म्हणुनी देवाला देऊ
श्रध्देने उपवास  सारे धरू या।।
मनोभावे गणेशाला स्मरूया।।५।।
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
--------------------------------------------
    - नवनाथ ठाकुर -खिडकाळी
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा