आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, ९ मार्च, २०२२

कवयित्री सुरेखा गावंडे लिखित संजीवन काव्य संग्रह प्रकाशन आणि ऑक्सिजन फाॅर लाईफ लघु चित्रपटाचा प्रिमियम शो संपन्न...!!

ठाणे : दि ८/३/२०२२ रोजी महिला दिनाचे औचित्य साधून कल्याण येथील प्रसिद्ध कवयित्री सुरेखा गावंडे यांचा पाचवा काव्य संग्रह“ संजीवन” आणि “ऑक्सिजन  फाॅर लाईफ” या लघु चित्रपटाचा पोस्टर लाँच सोहळा कल्याण येथील जलाराम हाॅल सहजानंद चौक येथे संपन्न झाला.या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून कल्याण येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री जगन्नाथ (आप्पा) शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून  दैनिक सामनाचे पत्रकार,सुप्रसिद्ध कवि,गझलकार माधव डोळे तसेच  सार्वजनिक वाचनालय कल्याणचे सरचिटणीस श्री भिकू बारस्कर सर  “ऑक्सिजन  फाॅर लाईफ”  या लघु चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सुषमा सिनलकर सह इतर सर्व कलाकार उपस्थित होते...
        उपस्थित मान्यवरांनी  “ऑक्सिजन फाॅर लाईफ” या चित्रपटाचा प्रिमियम शो पाहिल्यानंतर सुरेखा गावंडे यांच्या या पहिल्याच कलाकृतींचे तोंडभरून कौतुक केले..
   या प्रकाशन सोहळ्यास श्री अशोक गावंडे यांच्या सह समस्त गावंडे कुटुंब आणि सुरेखा गावंडे यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता यात प्रामुख्याने जेष्ठ रंगकर्मी सुधीर चित्ते, ठाणे मिररचे संपादक श्री वेंकटेश रापेल्ली, कवी संदीप कांबळे, कवयित्री सुरेखा गायकवाड, कवयित्री अनिता देशमुख,अनिता कळसकर, आदी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी पाटील यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

तुटलेल्या चेंबर व झाकण यांची दुरुस्ती : मुलुंड मधील वाहतूक कोंडी समस्या झाली दूर ; टी वॉर्ड कडून त्वरित दखल मात्र लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष!!

मुंबई : मागील आठ दिवस अपना बाजार समोर, गालाकुंज सोसा. गेट, नेहरू रोड, मुलुंड( प), मुंबई येथील  चेंबर व झाकण तुटलेल्या अवस्थेत होते. तिथे प्ल...