आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२६

तुटलेल्या चेंबर व झाकण यांची दुरुस्ती : मुलुंड मधील वाहतूक कोंडी समस्या झाली दूर ; टी वॉर्ड कडून त्वरित दखल मात्र लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष!!

मुंबई : मागील आठ दिवस अपना बाजार समोर, गालाकुंज सोसा. गेट, नेहरू रोड, मुलुंड( प), मुंबई येथील  चेंबर व झाकण तुटलेल्या अवस्थेत होते. तिथे प्लास्टिक बॅरिकेट लावून ठेवले होते. पण दुरुस्ती होत नव्हती काही लोकांनी ही बाब स्थानिक पत्रकार सतिश पाटील यांच्या लक्षात आणून दिली. त्यानुसार त्यांनी त्वरीत मुलुंड पालीका 'टी' विभाग अत्यावश्यक सेवा यांच्याशी फोनवर संपर्क साधून रितसर फोटो व विडिओ शेयर करून तक्रार दाखल केली.bmc com no 9123 दुसऱ्या दिवशी पुन्हा पाठपुरावा केला.  पाऊस थांबल्यावर काम चालू केले आणि संध्याकाळ पर्यंत रस्त्यावरील अडचण दूर केली याबाबत त्यांनी बीएमसी टी वॉर्ड ला धन्यवाद दिले.
      खरंतर मुलुंड मधील नेहरू रोड हा स्टेशन पासून नाहूर गाव,सर्वोदय नगर पर्यंत मुख्य व नेहमीच वर्दळीचा असतो. याठिकाणी बेस्ट बस मार्ग आहे. शाळेतील विद्यार्थी, मुलुंडकर नागरिक, रिक्षा,बाईक, कार व इतर वाहनांची नेहमीच रेलचेल असते.त्यातच शेजारी जोड रस्ता विठ्ठल नगर भागातील असलेला सेवाराम लालवाणी रस्ता गोशाळा ते वल्लभ भाई रोड गेले वर्षभर पुल दुरुस्ती साठी बंद आहे. त्यामुळे सर्व ताण हा नेहरू रोड वर येतो. कधी काम पुर्ण होणार यांची काहीच माहिती मिळत नाही. 
      या दोन्ही विभागातील लोक प्रतिनिधी एकाच पक्षाचे आहेत तरीदेखील होणाऱ्या पुलाच्या विलंबाची दखल का घेतली जात नाही हे देखील एक कोडे आहे. वास्तविक मुलुंड मधील सर्व नगरसेवक व आमदार हे सत्ताधारी पक्षाचे असूनही ही मुलुंड वाशियांना अनेकदा वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते ही मुलुंड करांसाठी खेदाची गोष्ट आहे. कारण हे लोकप्रतिनिधी नेहमीच कार्य सम्राट ही पदवी लावत असतात. बरेच वेळा प्रतिनिधी अनेक पदाधिकारी यांना कामाबद्दल विचारले असता माझ्या विभागात येत नाही बोलून मोकळे होतात. मग या समस्या कोणी सोडवायच्या असा गहन प्रश्न सामान्य नागरिकांना पडलेला आहे. इलेक्शन पुरते वार्डात फिरणार का फक्त कामे कोण करणार? पाणी, रस्ते, नाले,पुल, पाणीभराव, फुटपाथ,डागडुजी वीज,गार्डन अपातकाल हे कोणाच्या अधिपत्यामध्ये मोडते. सामान्य नागरिक आधीच घर, नोकरी धंदा यात व्यस्त असतो.कामावर गेले नाही तर चालणार नाही कारण सर्वच काय सरकारी बाबू नाहीत ना! वेळ, काम, पाठपुरावा सांगड घातली तरच कामे मार्गी लागतात नाहीतर हजारो लोक रस्त्यावर ये जा करत असतात पण कानाडोळा करून आपला रस्ता पार करतात बोलणार कोणाला? आजकाल वेळ नाही कोणाला अशी खंत सतीश पाटील यांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

तुटलेल्या चेंबर व झाकण यांची दुरुस्ती : मुलुंड मधील वाहतूक कोंडी समस्या झाली दूर ; टी वॉर्ड कडून त्वरित दखल मात्र लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष!!

मुंबई : मागील आठ दिवस अपना बाजार समोर, गालाकुंज सोसा. गेट, नेहरू रोड, मुलुंड( प), मुंबई येथील  चेंबर व झाकण तुटलेल्या अवस्थेत होते. तिथे प्ल...