आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १२ मार्च, २०२२

विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई सुरूच राहणार

अलिबाग:- विनामास्क फिरणाऱ्या इसमांवर करण्यात येणारी दंडात्मक कारवाई बंद करुन विनामास्क केसेस करण्यात येवू नयेत, असे पोलीस अधीक्षक, रायगड यांच्या कार्यालयाकडून पाठविण्यात आलेले दि.07 मार्च 2022 चे पत्र समाजमाध्यमांव्दारे फिरत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.

      तरी विनामास्क फिरणाऱ्या इसमांवर करण्यात येणारी दंडात्मक कारवाई बंद करण्याबाबत शासनाकडून कोणत्याही प्रकारचे निर्देश जारी करण्यात आलेले नाहीत,असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी कळविले आहे. विनामास्क केसेसमध्ये दंड न करण्याबाबतचे  दि.07 मार्च 2022 रोजीचे पत्र अपर पोलीस अधीक्षक, रायगड यांनी त्यांच्याकडील दि.11 मार्च 2022 रोजीच्या पत्रान्वये मागे घेतले आहे.

       तरी विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल तसेच शासनाने कोविड-19 अनुरुप वर्तनासंदर्भात दिलेल्या अटी व शर्तीचे तंतोतंत पालन केले जाईल याची दक्षता घ्यावी,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

तुटलेल्या चेंबर व झाकण यांची दुरुस्ती : मुलुंड मधील वाहतूक कोंडी समस्या झाली दूर ; टी वॉर्ड कडून त्वरित दखल मात्र लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष!!

मुंबई : मागील आठ दिवस अपना बाजार समोर, गालाकुंज सोसा. गेट, नेहरू रोड, मुलुंड( प), मुंबई येथील  चेंबर व झाकण तुटलेल्या अवस्थेत होते. तिथे प्ल...