हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून दिड दशकां पूर्वी महाराष्ट्रात तिथी प्रमाणेच दोनदा शिवजयंती साजरी केली जात असे म्हणून काँग्रेस राजवटीत २००८ मध्ये महाराजांचे वंशज व इतिहास संशोधकांच्या मान्यतेनुसार १९ फेब्रुवारी हि शिवजयंती तारीख निश्चित करण्यात आली आहे तरी काँग्रेसच्या भाई जगतापना यंदा तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती करावी लागते.जयंती तिथीप्रमाणे साजरी करण्याचा शिवभक्तांचा हा हक्क आहे तो त्यांनी जरूर बजवावा मग पुण्यतिथीला तिथीचा हट्ट का धरला जात नाही कारण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी श्री हनुमान जयंती असते. यंदा तारखेप्रमाणे जयंती १९ फेब्रुवारी तर तिथीप्रमाणे २१ मार्च आली आहे तर पुण्यतिथी तारखेप्रमाणे ३ एप्रिल तर तिथीप्रमाणे १६ एप्रिल येत आहे.छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे भाग्यविधाते आहेत.महाराजांचे संघटन प्रशासन व युद्धकौशल्य आजही लागू पडते म्हणून तारखेप्रमाणे जयंती व पुण्यतिथी साजरी होणे हि काळाची गरज आहे.१८७० महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडावरील महाराजांची समाधी शोधून शिवजयंती साजरी करण्याची प्रथम प्रथा सुरू केली याचे विस्मरण खेदजनक आहे.२ ऑक्टोबर महात्मा गांधी तर १४ एप्रिल डॉ.आंबेडकर जयंती देश-विदेशात साजरी केली जाते व हे दिवस समस्त भारतीयांच्या अंगवळणी पडले आहेत. यंदा महापालिका निवडणुकांमुळे राजकारण्यांना उत्सव साजरे करण्यास मोकळे रान मिळाले आहे पुढच्या वर्षी मात्र हा उत्साह मावळलेला असेल यात शंका नाही.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
पवईतील आंबेडकरी चळवळीतील युवा तडफदार धाडसी नेतृत्व हरपले
पवई (प्रतिक कांबळे): पवईतील आय.आय.टी संकुलात कामास असलेले आंबेडकरी विचारधारेचे युवा तडफदार धाडसी नेतृत्व सदैव समाजकार्य करण्यासाठी तत्पर अ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा