मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून टी एम जी क्रियेशन व अमरदिप बालविकास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने "राज्यस्तरीय नारीशक्ती गौरव" तसेच महाराष्ट्र नारीरत्न आयकॉन पुरस्कार, महाराष्ट्र उद्योग भरारी आयकॉन पुरस्कार, टी . एम. जी. मिडीया एक्सलन्स पुरस्कार अश्या विविध पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
रविवार दि . २० मार्च रोजी सायं . मुंबई मराठी पत्रकार संघ येथे हा सोहळा पार पडला. ह्या कार्यक्रमाचे आयोजन अमरदिप बालविकास फाऊंडेशन चे संस्थापक एन डी खान ह्यांच्या संकल्पनेतून हा सोहळा दिमाखदार झाला. अध्यक्षा सलमा खान आणि सहसंचालिका तस्लिमन खान यांनी केले होते.
यावेळी सुनिता नाशिककर ( मा . पोलिस उपअधीक्षक ), यास्मिन मोलकर ( उप आयुक्त , जी.एस.टी. ) मा . संजिवनी जाधव ( सिने अभिनेत्री वस्त्रहरण फेम ) मा . वर्षा पडवळ ( सिने अभिनेत्री ) मा . नमिता राणे ( मॅनेजिंग डायरेक्टर ग्रे शेडस इनोवेशन लि . ) सौ . सलमा खान ( सचिव ABF ) MG मा . जया अलिमचंदानी ( संस्थापक जया अलिमचंदानी फाऊंडेशन ) सन्मा अतिथी मा.डॉ. सारिका पाटील ( सिनियर मेडिकल अँड नोडल ऑफिसर , रुग्णालय ) हे सर्व सन्माननीय अतिथी उपस्थित होते.
सामाजिक, शैक्षणिक, तसेच कला व मीडिया क्षेत्रातील महिलांच्या कार्याची दखल घेत हा सोहळा अतिशय सुंदररित्या पार पडला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा