मार्गताम्हाने : येथील डॉ तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या वतीने एथीक्स अँड डायलॉजिक टिचिंग मेथडॉलॉजि इन हायर एज्यूकेशन या विषयावरती आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. नातू महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या वतीने भवन्स कॉलेज मुंबई, सिनियर कॉलेज लांजा आणि आय सी एस कॉलेज खेड या महाविद्यालयातील इंग्रजी विभागांबरोबर समंज्यस्य करार करण्यात आले आहेत. या अंतर्गत नातू महाविद्यालय मार्गताम्हाने,भवन्स कॉलेज मुंबई व लांजा कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि 19/03/2022 रोजी सायंकाळी 4:00 वाजता आयोजित उपरोक्त आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये डॉ एल्हाम हुसेन ढाका सिटी कॉलेज ढाका बांगलादेश हे संशोधक प्राध्यापक एथीक्स इन एज्यूकेशन : रिस्पॉन्सीबीलिटीज ऑफ टीचर्स अँड स्टुडंटस इन द एज ऑफ डीजीटलायझेशन या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. तर डॉ शिवाजी सरगर इंग्रजी विभाग मुंबई विद्यापीठ मुंबई हे डायलॉजिक टिचिंग मेथडॉलॉजि अँड इंटरपर्सनल रिलेशनशिप बिट्वीन टीचर्स अँड स्टुडन्टस या विषयावरती उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी शिक्षक, प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी https://forms.gle/vC7unvV4Liss7X879 या लिंकवर क्लिक करून आपले रजिस्ट्रेशन करावे व https://t.me/+4dIOTn3vo_M3Nzg9 या लिंकवर क्लिक करून वेबिनारसाठी निर्माण केलेल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन नातू महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ सुरेश सुतार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9146604188, डॉ सुतार सर,9860104083 डॉ राजीव कांबळे, 9421229765, या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
फक्त रात्रशाळा शिक्षकाचा प्रवास टपाल तिकीटावर उमटला ; "प्रा. नागेश हुलवळे यांच्या बहुआयामी कार्याची दखल"
अहिल्यानगर जिल्हाच्या अकोले तालुक्यातील जांभळे या छोट्याशा गावातील प्रा. नागेश हुलवळे यांचा भारतीय डाक विभागाने 'माय स्टॅम्प...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा