अध्यक्षा - श्रीया फाऊंडेशन, पाले
संचालिका - श्रीया अकॅडमी पाले,- कॉमन सर्विस सेंटर (CSC) कोप्रोली
- आपले सरकार सेवा केंद्र कोप्रोली
समाजकार्य व अंगातील उद्योजिका स्वस्थ बसू देईना म्हणून बी ए, बी एड् शिक्षण घेऊन सुद्धा नोकरीच्या मागे न लागता समाजासाठी कष्टकरी महिलांसाठी काहीतरी करण्याच्या ध्यासाने स्मिता संदीप म्हात्रे यांची पावले पडत गेली. सन 2003 पासून गावपातळीवर विविध सांस्कृतिक क्रीडा व सामाजिक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन त्यांनी केले आहे. प्रामुख्याने खास महिलांसाठी सन 2007 मध्ये पाले येथे महिला स्वयंरोजगार शिबिराचे आयोजन केले यावेळी अडीचशेच्या वर महिलांना व्यवसाय मार्गदर्शनाबरोबरच मेणबत्ती अगरबत्ती व फिनोईल कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिक दाखविले. श्रीया अकॅडमी मार्फत विविध शाळेतील मुला मुलींना व्यवसाय कसे करावे याचे मार्गदर्शन केले. गावागावात महिला बचत गट स्थापन करणे त्यांना मार्गदर्शन करणे व सरकारी योजनांबाबत माहिती देऊन जनजागृती करणे आदि कामे केली. उरण पनवेल पेण व खालापूर येथील जवळजवळ 200 च्या वर महिला बचत गटांना मेणबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण दिले, गावामध्ये नृत्य स्पर्धांचे आयोजन करणे, सर्व मैदानी व पारंपारिक खेळांच्या स्पर्धा भरविणे, रांगोळी स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, पुरुष व महिलांच्या कबड्डी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजूषा स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले. श्रीया अकॅडमी मार्फत पाले गावामध्ये दंतचिकित्सा आरोग्य शिबिर भरवले जवळपास 130 रुग्णांनी त्याचा लाभ घेतला, त्याचबरोबर गावातील हनुमान मंदिरात ग्रॅनाईट फरशी बसवली व बाहेरील अंगणात लादी बसून सुशोभीकरण केले. गावातील व प्राथमिक शाळेतील मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दर वर्षी 26 जानेवारीला विविध शारीरिक व बौद्धिक स्पर्धांचे आयोजन केले . त्याचप्रमाणे गावातील जिल्हा परिषद शाळेला इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मोफत पी टी चा ड्रेस टी-शर्ट व ट्रॅक पॅन्ट तसेच आयडी कार्ड चे वाटप केले शिवाय शाळा डिजिटल करण्यासाठी आर्थिक मदती बरोबरच कॅनोन चा कलर प्रिंटर भेट दिला. शाळेच्या कंपाउंड वॉल ला रंगरंगोटी करण्यासाठी पाच हजाराचा कलर पेन्ट दिलेला आहे. झाडे लावण्यासाठी प्रोत्साहन देतो सरकारी योजनेतील अंबा, नारळ, फळझाडे व फुलझाडे यांचे दरवर्षी मोफत वाटप केले.पाले गावामध्ये शून्य कचरा व्यवस्थापन व सेंद्रिय खतांचा वापर यासंबंधी जनजागृती अभियान राबविले. अल्प फी मध्ये महिलांसाठी कॉम्प्युटर टेलरिंग व कटिंग मेहंदी ब्युटीशियन कोर्सेससाठी प्रशिक्षण देण्याची सुविधा पूर्व विभागातील महिलांना मुलींना करून दिलेली आहे. केवल प्रशिक्षणच नाही तर त्यांना व्यवसाय करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन केले जाते. अनेक महिलांनी आज आपला स्वतःचा व्यवसाय चालू करून आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देत आहेत. सन 2011 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार विभाग अलिबाग यांच्यामार्फत कोप्रोली या मध्यवर्ती ठिकाणी भव्य रोजगार मेळावा आयोजित केला होता. यात 750 उमेदवारांनी हजेरी लावली होती व 44 जणांना यामध्ये रोजगाराची संधी प्राप्त झाली. संस्थेमार्फत गरीब व गरजू मुलांना मोफत वह्या वाटप, एम्प्लॉयमेंट नोंदणी शिबिर, कवी संमेलन, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, पॅन कार्ड शिबिर आयोजित केलेले आहे. दरवर्षी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करून त्यांना व्यवसाय मार्गदर्शन व व्यवसाय करण्यास प्रवृत्त करतो. भारत सरकारच्या व महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना सेवासुविधा आहेत त्या प्रभावीपणे राबवतो. कॅशलेस इंडिया व स्वच्छतेची संकल्पना गावागावात व दुर्गम आदिवासी वाड्यांवर प्रभावीपणे रुजवली आहे. विविध ग्रामपंचायती व आदिवासी वाडी मध्ये जाऊन कॅशलेस इंडिया व गाव स्वच्छतेचे प्रमोशन केले आहे. पाले गावांमध्ये गाव स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण गाव अंगणवाडी व शाळा परिसर स्वच्छ स्वच्छ केला. यावेळी साडेतीनशे च्यावर नागरिक या स्वच्छता अभियानात सामील होते. हळदी कुंकू निमित्ताने महिलांना मासिक पाळीच्या वेळी स्वतःची स्वच्छता कशी ठेवायची याचे महत्त्व मान्यवरांच्या माध्यमातून सांगितले यावेळी 250 महिलांना सॅनेटरी नॅपकिन चे मोफत वाटप केले आहे. भारत सरकारच्या कृषी सन्मान योजना, आयुष्यमान भारत योजना, ई-श्रम योजना, संगणक साक्षरता योजना प्रत्येक गावागावात मुख्यता आदिवासी वाड्यांवर मोफत राबविले आहेत. पाले गावातील नागरिकांसाठी मोफत आधार कार्ड शिबिर आयोजित केले होते. कोरोना काळात अनेक गरजूंना धान्याचे वाटप तसेच सॅनिटाझर व मास्क चे मोफत वाटप केले. गावागावात जाऊन कोरोना बाबत जनजागृती केली. रस्त्यावर बसणारे भाजीवाले किंवा आदिवासी बांधवांना माक्स व सॅनिटायझर चे अनेकदा वाटप केले आहे. पाले गावातील सन 1942 च्या ऐतिहासिक विहिरीची संपूर्ण डागडुजी स्वखर्चाने केली.
भविष्यामध्ये स्मिता म्हात्रे या महिलांसाठी व गरीब गरजू लोकांसाठी विविध उपक्रम संस्थेमार्फत राबवणार आहेत.यात प्रामुख्याने स्वयंरोजगार, वृक्ष लागवड, पाणीबचत, आरोग्य व लहान मुलांची काळजी कशी घ्यावी, शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या मार्फत येणार्या सन्मान योजना राबविणे, महिला बचत गटांना प्रोत्साहन देणे, महिलांसाठी तांत्रिक शिक्षणाची व्यवस्था करणे आदी उपक्रम राबविन्याचा स्मिता म्हात्रे यांचा संकल्प आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा