आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ८ मार्च, २०२२

सौ. जाग्रुती सचिन ठाकूर, जसखार-उरण (नुत्य कलाकार व नुत्य दिग्दर्शक )

वयाच्या 7 व्या वर्षापासून आपल्या  नुत्याची सुरवात करून जागृती ठाकूर यांनी अनेक तालुका व जिल्हा स्तरीय नुत्य स्पर्धेत यश संपादित केले आहे.आणि पुढे जाऊन श्री रत्नेश्वरी कलामंच जसखार चे सर्वेसर्वा महाराष्ट्र राज्य पुरस्कार 2022 प्राप्त श्री सचिन लहू ठाकूर यांच्या सोबत विवाह बंधनात अडकल्यानंतर  त्यांच्या नुत्य कलेला खरी कलाटणी मिळाली. घर आणि मुलाला सांभाळून रत्नेश्वरी कलामंचची जिम्मेदारी हाती घेऊन महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र राज्या बाहेर जाऊन अनेक स्पर्धा व ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून आपली नुत्य कला सादर करत आलेली आहे. 

तसेच ZEE TV वरील डान्स इंडिया डान्स सूपर मॉम्स या इंटरनेशनल डान्स reailty शो मध्ये थेटर राऊंड (Top16) पर्यंत  मजर मारली आहे. तसेच दूरदर्शन, E TV मराठी, ETV कन्नड, ETV तेलगु, ETV बंगाली इत्यादी TV क्षेत्रात जागृती ठाकूर यांनी आपली नुत्याची अदा सादर केली आहे.

युटूबच्या माध्यमातून साई तुझ्या भेटीसाठी, दिला निरोप एकवीरा माऊलीला, आम्ही मुंबईचे राजे, पुनवचा चांद , एकवीरा माय माऊली, रत्नेश्वरी माऊली नवसाला पावली अश्या अनेक गाण्यांच्या माध्यमातून प्रत्येकघरा घरात पोहचली आहे.

गेली 25 वर्ष नूत्य कलेशी प्रामाणिक राहून आता पर्यंत जागृती ठाकूर यांनी 700 च्या वर मुला मुलींना नुत्याचे धडे दिले आहेत व देत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

डॉ. प्रभाकर तुकाराम कांबळे यांना ‘वंदे मातरम् सन्मान पुरस्कार’

मुंबई : (प्रतिनिधी )सामाजिक, कामगार आणि जनसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे डॉ. प्रभाकर तुकाराम कांबळे यांना त्यांच्या सामाजिक कार्...