आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १२ मार्च, २०२२

महिला बचत गट अध्यक्ष सौ.मदिना अब्दुल शेख यांच्या पुढाकाराने महिला दिन उत्साहात साजरा

उल्हासनगर ( प्रतिनिधी ):-  दिनांक 8 मार्च 2022 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सायंकाळी 4 वाजता श्रीराम मंदिर लेप्रसी कॉलनी वॉटर सप्लाय ऑफिस उल्हासनगर 4 येथे तीन नवीन बचत गटांचे उद्घाटन करण्यात आले,आद्य शिक्षिका फातिमा शेख महिला बचत गट, कै. पूज्य (आईसाहेब) पार्वतीबाई पटवर्धन महिला बचत गट,अंतराळ वैज्ञानिक सुनीता विल्यम्स महिला बचत गट या उपक्रमाकरिता श्रीमती. वैजू वहिनी भागवत यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन व पाठबळ मिळाले.याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे होते. स्थानिक विभागीय नगरसेविका सौ. ज्योत्स्ना ताई जाधव,माजी नगरसेविका श्रीमती.मंदाताई सोनकांबळे, सौ.माधुरी मोरे,श्री.अविनाश चिंतामण म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते कुष्ठरोग दिन दलित सेवा संघाचे सचिव,जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे महाराष्ट्र प्रवक्ते, पत्रकार उत्कर्ष समितीचे (महाराष्ट्र) कार्यकारी अध्यक्ष श्री अविनाश म्हात्रे ,  पद्मश्री डॉ.शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन या संस्थेअंतर्गत सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रशांत कांबळे, आणि त्यांच्या पत्नी सौ. गीता कांबळे( दहिसर, मुंबई), स्वप्नपूर्ती वस्ती स्तर मानसी बचत गटाच्या अध्यक्ष अहिल्याताई, अमय बचत गटाच्या अध्यक्षा ललिता ताई हावरगी ( अंबरनाथ), अर्पिता बचत गट सदस्य कल्पनाताई नायकोडी ( अंबरनाथ) यांची उपस्थिती लाभली.

  या बचत गटां द्वारे उल्हासनगर येथील महिलांना विविध कुटिर उद्योग, गृह उद्योग यातून महिलांची आर्थिक प्रगती कशी होऊ शकते, याबद्दल आलेल्या पाहुण्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले.सदर उपक्रम श्रीराम मंदिर कुष्ठरुग्ण वसाहत पंच कमिटी, श्रीराम महिला बचत गट, सावित्रीबाई फुले महिला बचत गट,(आईसाहेब) पार्वतीबाई पटवर्धन महिला बचत गट, आद्य शिक्षिका फातिमा शेख महिला बचत गट, सुनीता विल्यम्स महिला बचत गट अध्यक्ष सौ.मदिना अब्दुल शेख यांच्या पुढाकाराने पार पाडण्यात आला.यावेळी मदिना शेख यांच्या सामाजिक कार्याची सर्वानी भरभरून स्तुती केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बौद्धजन पंचायत समिती तालुका दापोली मुंबई विभाग कार्यकारिणी बिनविरोध घोषित

मुंबई  (रामदास धो. गमरे):  बौद्धजन पंचायत समिती तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या समितीच्या मुंबई विभाग सभासद आणि रहिवाशांची सर्वसाधारण सभा ...