आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १२ मार्च, २०२२

रा. स्व. सं जनकल्याण समिती परळ भागाच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न..!

मुंबई (महेश्वर तेटांबे)- रा. स्व. सं जनकल्याण समिती परळ भागाच्या वतीने जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम रविवार ६ मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. स्वर्गीय लतादिदींना श्रदधांजली वाहून त्यांच्या निवडक गाण्यांनी कार्यक्रमाची सुरूवात झाली.  स्रीरोगतज्ञ डॅा. दिपाली काळे ह्यांनी कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून भूमिका बजावली. ह्या व्याख्यानातून त्यांनी उपस्थितांना महिलांच्या शारिरीक आणि मानसिक पैलुंवर मार्गदर्शन केले. जनकल्याण समिती परळ विभाग कार्यावह श्री. प्रताप शिवराम परब ह्यांनी आपली उपस्थिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली व प्रेरणात्मक संबोधन केले.  ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रणाली गवस व स्नेहा पारकर ह्यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच महिला आणि पुरूष कार्यकर्त्यांची मेहनत उल्लेखनीय होती. हा कार्यक्रम परळ भाग अध्यक्ष श्रीमती नयना सावंत ह्यांच्या देखरेखीत उत्तमरित्या पार पडला.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पवईत आयुष्य फाऊंडेशन तर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न

मुंबई : रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान.बघायला गेलात तर रक्ताचा पुरवठ्यासाठी ठिकठिकाणी बऱ्याचदा संघटनेच्या वतीने किंवा राजकीय पक्षांच्या वतीने र...