मुबंई :(उदय दणदणे )-भागोजी चॅरिटेबल ट्रस्ट (रजि.) या कोकणातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थेच्या वतीने वर्षभरात अनेक उपक्रम राबवले जातात.करियर मार्गदर्शन तसेच विद्यार्थी मार्गदर्शन शिबीर सारखे विविध उपक्रम राबवत संस्थेच्या वतीने समाजात आपल्या कर्तृत्ववान कामगिरीने नावलौकिक करणाऱ्या निवडक व्यक्तींना प्रतिवर्षी पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करून समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात येते.यावर्षी संस्थेच्या वतीने पुरस्कार निवड समितीने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील मूर्तवडे गावातील ( कातळवाडी ) येथील मूळ रहिवाशी,कौटुंबिक परिस्थितीची झळ सोसत,नोकरी करता-करता पदवीधर शिक्षण पूर्ण करून कामानिमित्त मुबंई ( बोरिवली ) येथे वास्तव्यास असणारे अभ्यासू व्यक्तीमत्व, सामाजिक कार्यकर्ते / युवा पत्रकार कु दिपक धोंडू कारकर यांना पत्रकारिता क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल यंदाचा विशेष पत्रकारिता पुरस्कार - २०२२ जाहीर करण्यात आला असून रविवार दि.१३ मार्च २०२२ रोजी देवाडीगा संघ-७०/ए , हिंद तेज बिल्डिंग,दादासाहेब फाळके मार्ग,दादर- पूर्व मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
कला, क्रीडा,सामाजिक संघटनेच्या विविध पदावर कार्यरत असणारे कु दिपक कारकर यांना ओबीसी जनगणना समिती आणि ओबीसी फाउंडेशनच्या वतीने २०१८ मध्ये "महाराष्ट्र रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आजवर त्यांच्या नावे समाजातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल पाच महत्वपूर्ण पुरस्कार जमा आहेत.
सामाजिक,शैक्षणिक,बरोबरच उत्तम वक्ता व वक्तृत्व, वृत्तपत्रातुन प्रासंगिक लेखन करून समाजाला दिशादर्शक मार्गदर्शन करत पुन्हा एकदा पुरस्काराचे मानकरी झाल्याबद्दल कु दिपक कारकर यांचे सर्वस्तरातून अभिनंदनासह शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा