मुंबई(गणेश हिरवे)- आमदार व माजी राज्यमंत्री श्री रविंद्र वायकर यांनी जोगेश्वरीतील गृहनिर्माण संस्थांना आसन व्यवस्था ( बाकडे ) आणि Sanitizer मशीन दिले.कोरोनाच्या ओमिक्रोन या नव्या विषाणू पासून बचाव करण्याकरिता व तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्याकरिता प्रत्येकानी शासनाने दिलेल्या नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. त्याकरिता गृहनिर्माण संस्थांनी इमारतींच्या प्रवेश द्वारा जवळ हाताना निर्जंतुकीकरण करण्याकरिता मशीन मिळण्याकरिता व सोसायटीतील वयोवृद्ध नागरिकांना बसण्याकरिता आसन व्यवस्था ( बाकडी ) मिळावीत यासाठी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार व माजी राज्यमंत्री श्री रविंद्र वायकर यांना अर्ज दिले होते त्याप्रमाणे श्री वायकर यांनी तिसऱ्या टप्प्यात काही गृहनिर्माण संस्थांना प्रत्येकी दोन बाकडी व Sanitaizer मशीन विविध मान्यवर व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सोसायटीतील सदस्यांना दिले. पुढील काही दिवसांत इतर गृहनिर्माण संस्थांनी अर्ज दिलेले आहेत त्यांनाही दिले जाणार आहेत.
याप्रसंगी विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, उपविभाग प्रमुख , बाळा साटम, जयवंत लाड, शाखाप्रमुख संदीप गाढवे, बाळा तावडे, प्रदीप गांधी, मंदार मोरे, नितेश म्हात्रे, महिला शाखा संघटक वैशाली भिंगार्डे ,शाखा समन्वयक उमेश कदम, स्वीय सहाय्यक अनिल म्हसकर, अविनाश रासम आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा