मुंबई :(पंकजकुमार पाटील ) -किक बॉक्सिंग असोसिएशन , मुंबई उपनगर च्या वतीने म्युनिसिपल शाळा , अंधेरी-पुर्व , मुंबई याठिकाणी दि १० ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या किक बॉक्सिंग जिल्हास्तरीय चॅम्पियनशिप -२०२१ या स्पर्धेत भांडुपमधील खेळाडू कु सुहानी मांडवकर हिने ५० किलोहून अधिक वजनी गटात ब्रॉन्झ पदक पटकावले . तसेच अमॅच्युयर स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन ,महाराष्ट्र आयोजित दि २४ ऑक्टोबर २०२१ रोजी थेरगाव , पुणे याठिकाणी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप -२०२१ या स्पर्धेत तीने आणखीन एका ब्रॉन्झ पदकाची कमाई केली. एकाच महिन्यात दोन विविध ठिकाणी व वेगवेगळ्या स्पर्धेत कु .सुहानी हिने हे दुहेरी यश मिळवले आहे . किक बॉक्सिंग स्पर्धेत मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे इतर सहकारी खेळाडू , मित्र मंडळी तसेच नातेवाईक यांच्याकडून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रमोद कर्नाड यांना ‘बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५’ जाहीर
नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख ) : बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व कवी प्रमोद कर्नाड यांना “बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अच...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा