आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, ५ जानेवारी, २०२२

सिडकोच्या गलथान कारभाराचे सिडको प्रकल्पग्रस्त शेतक-यांच्या वतीने कायदेतज्ञ अ‌ॅड. डी.के.पाटील आणि त्यांचे सुपुत्र अ‌ॅड.कौस्तुभ पाटील यांनी काढले कायदेशीर धिंडवडे

उरण (विठ्ठल ममताबादे )-अलिबाग येथील २ रे सह दिवाणी न्यायाधीश व स्तर यांच्या आदेशाने बेलीफ:-दिवाणी न्यायालय क स्तर वाशी-बेलापूर-नवी मुंबई यांच्या वतीने सोमवार दिनांक ०३/०१/२०२२ रोजी नवीन वर्षाच्या शुभमुहर्तावर नवीमुंबई प्रकल्पग्रस्त शेतक-यांना देशोधडीस लावणा-या सिडको रूपी बकासूराच्या घश्यातून शेतक-यांच्या हक्काचा घास खेचून आणणा-या कायदेतज्ञ अ‌ॅड.डि.के.पाटील आणि अ‌ॅड.कौस्तुभ पाटील पितापुत्रानी प्रकल्पग्रस्त शेतक-यांच्या वतीने कायदेशीर न्यायालयीन लढाई जिंकून वाढीव भरपाई मिळवून दिली असता निष्ठुर सिडको प्रशासन मात्र वाढीव मोबदला देण्यास टाळाटाळ करत असल्याचे पाहून अ‌ॅड.डि.के.पाटील यांनी गेंड्याच्या  कातडीच्या सिडको प्रशासनावर जप्तीचे आदेश संबंधीत अलिबाग येथील २ रे सह दिवाणी न्यायालयाच्या वतीने घेऊन  सिडकोची जंगम संपती जप्तीचे आदेश घेऊन प्रकल्पग्रस्त शेतक-यां समवेत सदर न्यायालयाचे बेलीफ आणि कायदेतज्ञ अ‌ॅड.डि.के.पाटील आणि त्यांचे सुपुत्र अ‌ॅड.कौतुभ पाटील या पितापुत्राने सिडको आ‌ॅफीस कोकण भवन येथे जाऊन जप्तीचा बडगा उगारला.संबधित अधिका-यांच्या खुर्च्या-टेबल प्रकल्पग्रस्त शेतक-यांनी सिडको कार्यालयातून उचलून घेऊन येत असताना गाढ झोपलेले की झोपेचे सोंग घेतलेले सिडको अधिकारी भानावर आले आणि त्यांनी शेतक-यां सोबत गयावया करून दहा दिवसाची मुदत मागू लागले असता येथील प्रकल्पग्रस्त  शेतक-यांनी आपला शेतकरी दिलदारपणा दाखवून दहा दिवसाची मुदत देऊन आपला दिलदारपणा सिडको समोर सिद्ध केला.

सदर मोबदला:- १) तुकाराम दुकल्या तांडेल वगैरे-६९३९९६०/- २) वसंत काशिनाथ पाटील- ८५७६६७१/-३)चंद्राबाई रामकृष्ण घरत- ७४१३०५९/- ४) अमित मोहन घरत-५४२५९९७/- ५) भिमराव जोमा पाटील-२७६७१७९१/-

   सदर रक्कमेला सिडकोला दहा दिवसाची मुदत वरील शेतक-यांनी देऊन शेतकरी मनाचा मोठेपणा निष्ठुर सिडको अधिका-यां समोर सिद्ध केला.या घटनेमुळे शेतकरी वर्गा मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मोहन जोशी यांना 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' घोषित...

मुंबई (गणेश तळेकर)  मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' यंदा ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांना घोषि...