आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, ५ जानेवारी, २०२२

जॉयचा निबंध स्पर्धा निकाल घोषित

मुंबई: जॉय सामाजिक संस्था मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यात अभिजित अहिरे यांच्या शेतकरी सन्मानाने कसा जगेल मुंबई-प्रथम क्रमांक, करोनामुळे बदललेलं जग-बकुल बोरकर द्वितीय,तर संजय जोशी नाशिक तृतीय-मराठी भाषा संस्कृती धोक्यात आणि उत्तेजनार्थ म्हणून रुपाली कांबळे-कोल्हापूर व शुभंगी गुरव-वसई यांची निवड झाली असून जॉय च्या एप्रिल २०२२ रोजी होणाऱ्या पारितोषिक वितरण समारंभात विजेत्यांना गौरविण्यात येणार असल्याचे जॉयचे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे यांनी कळविले आहे.नागरिकांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून जॉय तर्फे दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.त्याचाच भाग म्हणून सन २०२१ या वर्षात राखी स्पर्धा, भेटकार्ड तयार करणे,वृत्तपत्र लेखन स्पर्धा,निबंध स्पर्धा आदी आजोयन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेसाठी रुता रानडे, शिवाजी कुलाल,भाग्यश्री रावले, फिलिप रोड्रिक्स,गणेश हिरवे आदी मान्यवरांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रमोद कर्नाड यांना ‘बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५’ जाहीर

नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख ) : बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व कवी प्रमोद कर्नाड यांना “बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अच...