आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, ५ जानेवारी, २०२२

प्रियदर्शिनी विद्या मंदिर शाळेत आरोग्य शिबीर संपन्न

मुंबई : कांदिवली येथील प्रियदर्शिनी शाळा व नाईट कॉलेज येथे शालेय विध्यार्थीसाठी ४ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व क्रांतिसूर्य सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आरोग्य शिबीर संपन्न झाले.या शिबिराचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक-प्राचार्य व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र प्रमुख मा मंगेश लाड सरांच्या हस्ते करण्यात आले.मुंबई महानगर पालिकेच्या डॉ स्वाती साळुंके,त्यांचे सहकारी उर्मिला पाटील,कुणाल साळुंखे आदी टीमने विधार्थीची तपासणी केली.यावेळी शाळेतील जवळपास शंभरहून अधिक विद्यार्थ्यांची  उंची,वजन,डोळे,दात व इतर आरोग्यविषयक समस्यांचे निदान करण्यात येऊन त्यांना स्वच्छतेचे महत्व सांगण्यात आले..या शाळेत येणारे विद्यार्थी  हे गोर-गरीब व वंचित कुटुंबातील आहेत व यांना सर्वतोपरी सहकार्य करणे व त्यांची काळजी घेणं ही आमची जबाबदारी आहे व या निमित्तानेच आम्ही या शिबिराचे आयोजन केले होते असे लाड सरांनी सांगितले.शिबिरासाठी मराठी माध्यमाच्या पर्यवेक्षिका सुलभा कदम मॅडम, इंग्रजी माध्यमाच्या पर्यवेक्षिका प्राजक्ता पवार मॅडम व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ प्रियदर्शनी कॉलेज केंद्राचे संयोजक वाघ सर,प्राध्यापक ईश्वर खैरनार सर आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संपादक रफिक घाची यांना आदर्श संपादक पुरस्कार जाहीर

डहाणू दि. १८ : दैनिक 'डहाणू मित्र'चे संपादक व सामाजिक कार्यकर्ते रफिक गफार घाची यांना पत्रकारीता व सामाजिक क्षेत्रातील उ...