उरण दि ३(विठ्ठल ममताबादे ) -उरण विभागातील विविध गावातील उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ साठी बसलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप रा. जि. प. प्राथमिक शाळा कळंबुसरे येथे करण्यात आले. सदर आयोजित कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती कळंबुसरे,सर्व शिक्षक,पालक वर्ग आणि विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते. शालेय साहित्याचे वाटप संजय केणी तसेच गरूड झेप मंडळ विंधणे (अध्यक्ष -प्रमोद नवाळे )यांच्याकडून शैक्षणिक साहित्याकरिता कार्यक्रमात धनादेश सुपूर्त करण्यात आला. यावेळी कळंबुसरे शाळेतील हर्षाली नाईक जिल्ह्यात 23 वी तसेच जिया पाटील जिल्ह्यात 145 वी आल्याने या विद्यार्थिनीचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाची सांगता करताना उरण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विविध विद्यार्थ्यांचे , शाळेच्या मुख्याध्यापकांचे, वर्ग शिक्षकांचे व इतर शिक्षकांचे तसेच पालकांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा