आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, ५ जानेवारी, २०२२

उरण येथे रायगड जिल्हास्तरीय काव्यस्पर्धा बहरली

उरण -(विठ्ठल ममताबादे)  द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन युवा महोत्सव उरण येथील दि. ०२ जाने. २०२२ रोजीच्या सदर काव्य-स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील अनेक मान्यवर कवी-कवयित्रींनी उस्फुर्त भाग घेतला. आजी किंवा आजोबा, शेतकरी व पोलीस या दिलेल्या तीनही विषयांच्या अर्थपूर्ण-बहारदार रचनांसह सर्वांनी उत्तम सादरीकरण केले. स्पर्धेचे अध्यक्षस्थान युवा महोत्सवाचे अध्यक्ष महादेव घरत यांनी भूषविले. यावेळी अनेक मान्यवर, महोत्सवाचे कार्यकर्ते-पदाधिकारी आणि काव्य-रसिकांची उपस्थिती लाभली. परीक्षक म्हणून साहित्य क्षेत्रातील मान्यवर  गुरुदत्तजी वाकदेकर आणि अनुजजी केसरकर यांनी स्पर्धेचे चोख परीक्षण केले. काव्य-स्पर्धेचे नियोजन कवी- संजय होळकर, कवी- भ. पो. म्हात्रे, आणि स्पर्धा प्रमुख-निवेदक-मुख्य सूत्रसंचालक कविश्री अरुणजी द. म्हात्रे. यांनी सुबद्ध आखणीसह उत्तम प्रकारे केले.नियोजन व निवेदनाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

काव्य स्पर्धेचा निकाल:-प्रथम क्र.- प्रदीप दत्ताराम बडदे, द्वितीय क्र.- हेमाली बगाराम म्हात्रे, तृतीय क्र.- अमोल रामचंद्र गोळे, चतुर्थ क्र.- सुचित्रा अशोक कुंचमवार,उत्तेजनार्थ -- १- रमेश नारायण पाटील,२- अंजली अनंत कोळी, ३- समीर शंकर म्हात्रे,४- अनिल विनोद भोईर असे एकूण आठ विजेते क्रमांक काढण्यात आले. मान्यवरांच्या शुभहस्ते विजेत्यांना रोख रक्कम, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र तसेच सर्व सहभागधारकांना  प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अध्यक्ष, स्पर्धा प्रमुख व संयोजकांनी सर्व मान्यवरांचे, विजेत्यांचे, कवी-कवयित्रींचे आणि काव्य-रसिकांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मोहन जोशी यांना 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' घोषित...

मुंबई (गणेश तळेकर)  मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा 'रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार' यंदा ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांना घोषि...